City 60 SuperFast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा एका क्लिकवर : 11 June 2024
कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नालेसफाईचा दावा केला असला तरी, काही नाले ओसंडून वाहताना दिसून येत आहेत. न्यू गोविंदवाडी परिसरातील नाल्याचे पाणी रस्त्यावर.
नवी मुंबईतील ऐरोली भारत बिजली मार्गावरील लोखंडी कमान पावसामुळे अचानक कोसळली, सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी नाही.
ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली जवळ, रुणवाल नगर, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे येथील साधना विला सोसायटी बाजूला असलेलं होर्डिंग धोकादायक स्थितीत. होर्डिंग कॉन्ट्रॅक्टरला त्वरित होर्डिंग काढण्याचे आदेश.
ऐरोलीत पावसामुळे 40 फुटाची कमान कोसळल्याने वाहतुकीला अडथळा, कमान हायड्रा मशीनच्या साहाय्याने काढण्यात येणार असल्याची माहिती, तुर्तास कमान हटवेपर्यंत ठाणे-बेलापूर मार्गावर अवजड वाहनांना बंदी
ठाण्यातील नालेसफाईवरुन जितेंद्र आव्हाडांची महापालिकेवर टीका, नालेसफाईच्या टेंडरच्या चौकशीची आव्हाडांची मागणी, तर ही नालेसफाई असून हातसफाई असल्याचीही आव्हाडांची टीका.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बारवी येथील जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, हजरो लिटर पाणी वाया. जलवाहिनी फुटल्याने कल्याणमधील पाणीपुरवठा आज बंद राहणार.
रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील अस्तान-धनगरवाडी येथे भूस्खलन होऊन कोसळली दरड. मुख्य रस्त्यावर दरड कोसळल्याने बांदरी पट्ट्यातील अनेक गावांचा संपर्क काल मध्यरात्री पासून तुटलाय. गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे दरड कोसळली.