Chitra Wagh on Raut statement:जनता थोबाडात दिल्याशिवाय राहणार नाही,चित्रा वाघ यांनी राऊतांना सुनावलं
स्त्रीचा सन्मान करणं हा खरा महाराष्ट्रधर्म आहे. पण तुम्ही जसे काँग्रेसच्या संगतीत बसून हिंदुत्वद्रोही झालात, तसेच नवनीत राणांसारख्या एका स्त्रीचा अपमान करून महाराष्ट्रधर्मद्रोही झाल्याचाही पुरावा तुम्ही दिलात. त्यांना नाची म्हणून तुम्ही एका मराठी स्त्रीचा पाणउतारा केलात. स्वतः काँग्रेसच्या फडावर तुणतुणं घेऊन मर्कटनृत्य करणाऱ्याच्या तोंडी अशी विकृत भाषा शोभत नाही. स्वर्गीय बाळासाहेब राजकारणात महिलांचा आदर करायचे; तुम्ही बाईच्या पदरावर राजकारण करताय तुमच्या आजच्या ताळतंत्र सोडलेल्या भाषणाचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या आमच्या भगिनी यशोमतीताई ठाकूर यांची आणि त्यांच्या काँग्रेस पार्टीचीही संस्कृती या निमित्ताने दिसून आली… @AdvYashomatiINC सभ्यतेचे संकेत पायदळी तुडवून महिलांचा अपमान करणाऱ्या तुमच्यासारख्या शब्दपिसाटांना महाराष्ट्राची जनता नाचवल्याशिवाय राहणार नाही…