Chhagan Bhujbal Full PC : छगन भुजबळांनी शड्डू ठोकला, जरांगेंच्या एका एका मागणीला विरोध
Chhagan Bhujbal नाशिक : मनोज जरांगेंनी 'मराठा आरक्षणा'ची लढाई जिंकली आहे. सगेसोयरेसह मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या प्रमुख तीनही मागण्या मान्य झाल्या आहेत. याबाबत मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध केला. हा अध्यादेश नाही ड्राफ्ट आहे, नोटिफिकेशनचा मसुदा आहे. 16 तारखेपर्यंत हरकती घेऊ, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. Video Player is loading. Close Player छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाचा विजय झाला असे तुम्हाला वाटते. पण मला तसे वाटत नाही. झुंडशाहीच्या विरोधात असे निर्णय घेता येत नाही. ही सूचना आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. जे वकील असतील त्यांनी हरकती पाठवाव्यात. लाखोंच्या संख्येने हरकती पाठवाव्यात. सरकारच्या लक्षात येईल याची दुसरी बाजू देखील आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
