Bus Accident : महाराष्ट्रातील यात्रेकरुंच्या बसला नेपाळमध्ये अपघात, 16 जणांचा मृत्यू
Bus Accident : महाराष्ट्रातील यात्रेकरुंच्या बसला नेपाळमध्ये अपघात, 16 जणांचा मृत्यू
हे देखील
Video: राज ठाकरेंच्या भाषणावेळी अवकाशात गिरट्या; डोकं वर करुन पाहिलं, मनसे अध्यक्ष म्हणाले...
यवतमाळ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौरा सुरू केला असून सध्या ते विदर्भात मनसैनिकांच्या भेटी घेत आहेत. सोलापूरमधून सुरु केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यात राज ठाकरेंनी 2 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर, सुरू असलेल्या दौऱ्यात त्यांच्याकडून विधानसभा उमेदवारांची घोषणा होत असून आत्तापर्यंत 7 मतदारसंघांत त्यांनी मनसेच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. आज यवतमाळ येथील वणीमध्ये राज ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत मनसेचा मेळावा होता. या मेळाव्यात व्यासपीठावर राज ठाकरे बोलत असताना मनसेकडून पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून मनसेचं शक्तीप्रदर्शन करण्यात येत होतं. त्याचवेळी, पॅराग्लायडिंग करणाऱ्या व्यक्तीकडे पाहत राज ठाकरेंनी भाषण केलं, त्यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकल्याचं पाहायला मिळालंय .