MLC Elections:विधान परिषद निवडणुकीत भाजप - काँग्रेसमध्ये साटंलोटं, काही ठिकाणी बिनविरोध निवड निवडणूक
विधान परिषद निवडणुकीत आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि काँग्रेसमध्ये साटंलोटं पाहायला मिळालं. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत कोल्हापूर, धुळे आणि मुंबईत बिनविरोध निवड करण्यावर एकमत झालं. त्यानुसार कोल्हापूरात भाजपच्या अमल महाडिक यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. तर त्याबदल्यात धुळ्यात काँग्रेस उमेदवारानं माघार घेतल्यानं भाजपच्या अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. याशिवाय मुंबईत काँग्रेसनं उमेदवार न दिल्यानं भाजपच्या राजहंस सिंह यांचा विधान परिषदेत जाण्याचा मार्गही सुकर झाला. याशिवाय शिवसेनेचे सुनील शिंदे यांचीही निवड निश्चित झाली. विशेष म्हणजे कोल्हापूरात महाडिक आणि पाटील या कट्टर विरोधकांत सामना होणार होता. पण दिल्लीतून सकाळी फोन आला आणि सूत्रं फिरली. महाडिक कुटुंबीयांची बैठक झाल्यानंतर अमल महाडिक यांनी अर्ज मागे घेतला.