ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 21 December 2024
ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 21 December 2024
कल्याणमध्ये मराठी शेजाऱ्याला मारहाण करणाऱ्या शुक्लाच्या गाडीला बेकायदेशीर अंबर दिव्यासाठी नऊ हजारांचा दंड, गाडीसह दिवाही जप्त
शरद पवार आज बीड आणि परभणीचा दौरा करणार. यावेळी बीड मधील सरपंच कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेत, परभणीतील सुर्य़वंशी कुटुंबीयांची देखिल भेट घेणार...
बीडमधल्या सरपंच हत्याप्रकरणी वाल्मिक कराडवरून जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल...तर चौकशी करा, दूध का दूध पानी का पानी होऊ दे, धनंजय मुंडेंचं उत्तर...
नागपूरच्या सीताबर्डी परिसरात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनात बॅनरबाजी. सात वेळा आमदार असताना देखील मंत्री म्हणून का डावललं, बॅनरवर लिहिला मजकूर
भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्षांची आज नागपुरात बैठक, सत्तास्थापनेनंतर भाजपची पहिलीच बैठक, आगामी पालिका निवडणुका आणि खातेवाटपावर चर्चा अपेक्षित
अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटपाची शक्यता...नाराजीनाट्य उफाळून येऊ नये यासाठी महायुतीचा सावध पवित्रा, सूत्रांची माहिती...२३ तारखेला मंत्री संभाव्य खात्यांचा घेऊ शकतात चार्ज...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुढील दोन दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार, माथाडी कामगारांनी माल उचलला नसल्याने आज लिलावासाठी कांदा बाजारात आणला जाणार नाही.
सरकारकडून नव्या वर्षात एफएसआय फीवर १८ टक्के जीएसटीचा भुर्दंड, घरांच्या किंमतीत दहा टक्के वाढीची शक्यता, जीएसटी आकारणीचा फेरविचार करण्याची बिल्डरांची विनंती
सरसंघचालक मोहन भागवतांच्या कानपिचक्याचं उलेमा बोर्डाकडून स्वागत, उठसूठ दर्गा-मशिदींच्या सर्वेक्षणाची मागणी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर मिळाल्याचा अल्लामा बुनई हसनींचा दावा