एक्स्प्लोर

Baramati Lok Sabha : वास्तव भाग 27 : बारामतीत सरशी कोणाची? शरद पवारांची बस रिकामी का होत नाही?

पुणे : भाजपने अनेकदा बारामती लोकसभा मतदारसंघात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अपयश आले. अजित पवारांच्या (Ajit Pawar)  भाजपसोबत जाण्याने घड्याळाच्या रूपाने शरद पवारांचा या लोकसभा निवडणुकीत पराभूत करता येईल का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. ही निवडणूक दोन्ही बाजूने भावनिक करण्यात आली. या निवडणुकीत भावनिक कल्लोळ पाहायला मिळाला.

अजित पवारांनी काकांची साथ सोडली आणि भाजपसोबत सत्तेत गेले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात बारामती लोकसभा मतदारसंघ किंवा पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे शरद पवारांकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतके पदाधिकारी राहिले. बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करता पुरंदर वगळला तर सगळी राष्ट्रवादी अजित पवारांच्या बाजूला गेली. 

जरी नेतेमंडळी शरद पवारांना सोडून गेले असले तरी कार्यकर्ते आणि जनता कुणाच्या बाजून जाते हे पाहणे महत्त्वाचे असते. परंतु लोकांची भावनिक साथ ही शरद पवारांच्या बाजूने काहीशी झुकली असल्याचे दिसते आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कुणीही उमेदवार दिला नव्हता तोपर्यंत ही निवडणूक एकाबाजूला म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या बाजूला झुकली होती. पण जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचे नाव जाहीर झाले तेव्हापासून ही निवडणूक चुरशीची होणार हे ठरलेलं होते. आताही मतदानाचा टप्पा पार पडला असला तरी कोण बाजी मारते हे आताच सांगता येणार नाही.

अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा
अजित पवार फुटले त्यानंतर त्यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला. अजित पवार सातत्याने शरद पवारांवर टीका करू लागले. याचा उलट फटका आपल्यालाच बसतो आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या सबंध प्रचारातील भाषणांचा रोख बदलला. तिथपासून पुढे अजित पवारांनी शरद पवार यांच्या 1967 पासून बदललेल्या भूमिकेवर बोलायला सुरुवात केली. पण श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार, रोहित आणि राजेंद्र पवार यांच्याबाबत अजित पवार नाव न घेता बोलू लागले. 

एका बाजूला अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांच्यावर केलेली टीका बारामतीकरांना रुचली नाही, तर दुसरीकडे शरद पवारांच्या बाजूने रोहित पवारांनी आपल्या काकांचा कार्यभार उचलून घेतला. अजित पवार त्यांच्या कुटुंबातील लोकांवर बोलू लागताच त्यावर प्रतिक्रिया म्हणून सगळं कुटुंब अजित पवारांच्या विरोधात बोलू लागले. याला अपवाद होते सुप्रिया सुळे आणि शरद पवार. सुप्रिया सुळे यांनी प्रचारात अजित पवारांवर खूपच कमी वेळा निशाणा साधला. त्यांच्या टीकेचा रोख मुख्यत्वे भाजपावर राहिला. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक फार कौटुंबिक स्तरावर गेली. दोन्ही बाजूने एकमेकांवर टीकेची झोड उठवली.

बारामती लोकसभा मतदारसंघात 23 लाख 72 हजार 668 के मतदार आहेत त्यातील 59.37% मतदान झालं. 

बारामती लोकसभा मतदार संघाचा इतिहास
बारामती मतदार संघातून 1957 साली काँगेसचे केशवराव जेधे पहिल्यांदा निवडून गेले. तेव्हा पासून 1977 चा अपवाद वगळता कायमच ही जागा आघाडीकडे राहिली आहे. गेली 3 टर्म खासदार सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. 

गेली अनेक वर्षे बारामती लोकसभा मतदार संघावर पवारांचे वर्चस्व आहे. 1984 साली शरद पवार पहिल्यादा या मतदारसंघातून निवडून गेले. त्यानंतर कायमच ही सीट आघाडीकडे राहिली 1989 ते 91 मध्ये इंदापूरचे शंकरराव पाटील (हर्षवर्धन पाटील यांचे चुलते) निवडून आले. आणि त्यानंतर 1991 साली अजित पवारांना संधी मिळाली. पण विशिष्ठ राजकीय परिस्थितीत अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला आणि शरद पवारांनी 2009 पर्यत या मतदारसंघाचे नेतृत्व केलं. 2009 साली सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा सोडून शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले आणि निवडून आले. 

गेली अनेक वर्षे ही जागा पवारांकडे असल्याने पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची चांगली बांधणी केली. गेली अनेक वर्षे या मतदार संघात पवारांचे वर्चस्व आहे. त्यांनी हा मतदारसंघ बांधला आहे. त्यातील सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरते ते म्हणजे सहकार. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेकांना प्रतिनिधीत्व देऊन पवारांनी अनेकांना नेतृत्वाची संधी दिली. जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करताना सहकाराचे जाळे देखील बघावे लागते. 2009, 2014 आणि 2019 मध्ये सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या. 2009 मध्ये भाजपच्या कांता नलावडे यांचा 2014 मध्ये महादेव जानकर यांचा तर 2019 मध्ये भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव केला. 

2009 मधील मतांची विभागणी
सुप्रिया सुळे यांना 4,87,827 मते मिळाली.

कांता नलावडे यांना 1,50,996 मते मिळाली.

तब्बल 2 लाख 46 हजार मतांच्या फरकांनी सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता.

2014 साली महादेव जानकर हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते.

त्यामध्ये जानकर यांचा 69 हजार 666 मतांनी पराभव झाला होता.

2014 सालच्या मताची विभागणी
राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या.

कांचन कुल यांचा 1 लाख 30 हजार मतांनी पराभव झाला होता.

आता सुप्रिया सुळे यांची सुनेत्रा पावरांशी लढत झाली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी 59.37 टक्के आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

कसं आहे सध्याचं राजकीय बलाबल?
बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभेचा समावेश आहे. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर- हवेली, भोर आणि खडकवासला या सहा मतदारसंघाचा समावेश होतो. 

यामध्ये काँग्रेसचे दोन आमदार आहेत. यामध्ये संजय जगताप आणि संग्राम थोपटे या दोघांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी काम केले आहे.

आमदारांची ताकद अजितदादांसोबत
मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. ते म्हणजे स्वतः अजित पवार व दत्तात्रय भरणे. यामध्ये इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे अजित पवारांच्या गोटात आहेत. तर भाजपचेही दोन आमदार आहेत. राहुल कुल आणि भीमराव तापकीर. या दोहोंनी युतीधर्म निभावत सुनेत्रा पवार आणि पर्यायाने महायुतीचे काम केले. 

सुरुवातीला विजय शिवतारे यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय गोंधळ निर्माण झाला होता. शिवतारे यांनी अजित पवार आणि शरद पवारांवर टीकेची झोड उडवली होती. पण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना त्यांचे बंड शमवण्यात यश आले. तोपर्यंत शिवतारेंनी अजित पवारांना डॅमेज केलं होतं. पुन्हा डॅमेज कंट्रोल करत शिवतारे यांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ कंबर कसली आणि सुनेत्रा पवारांसाठी प्रचार सुरू केला.

मंगळवारी, 7 मे रोजी बारामतीमध्ये मतदान झाले. प्रारंभिक आकडेवारीनुसार हे मतदान गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत कमी झाले आहे. मतदान कमी झाले यापेक्षा मतदान कोणाचे कमी झाले हा मुद्दा महत्त्वाचा आहे. दोन्ही पक्षांच्या स्थानिक प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार त्यांनी हक्काचे मतदान करून घेतले आहे. त्यामुळे दोन्ही बाजू कडून विजयाचे दावे केले जात आहेत. 2019 मध्ये सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांच्यात लढत झाली. तेव्हा महायुतीसाठी महत्त्वाचा मतदारसंघ ठरला होता खडकवासला; तर सुप्रिया सुळेंसाठी महत्वाचा मतदार संघ ठरला होता बारामती. 

राष्ट्रवादीची संपूर्ण यंत्रणा अजित पवारांसोबत
या निवडणुकीला मात्र महायुतीची मदार खडकवासल्यावरही होती आणि इंदापूर, दौंडवरही होती. यावेळी पहिल्यांदाच असं घडलं की निवडणुकीच्या काही दिवस आधी संपूर्ण राष्ट्रवादीची यंत्रणा अजित पवार घेऊन गेले होते. सुप्रिया सुळेंना पोलिंग एजंट पासून प्रत्येक गोष्टीवर तयारी करावी लागली. सुप्रिया सुळे यांच्या बाजूला सहानुभूती होती. मात्र मतदान यंत्रापर्यंत मतदारांनास आणून देणारी यंत्रणा मात्र नव्हती. यंत्रणा नंतरच्या काळात उभारली गेली. मात्र तरी देखील ती कमकुवतच होती. त्या तुलनेत अजित पवारांकडे मुरब्बी मुरलेले गाव पुढारी होते आणि यंत्रणादेखील अजित पवारांकडे होती. अर्थात तिथेही एक मोठा अडसर पाहायला मिळाला. या गावकऱ्यांविषयी स्थानिक लोकांमध्ये नाराज होती. 

सुप्रिया सुळे यांचा प्रचार कुटुंबातील लोकांनी वाटून घेतला होता. पुरंदर तालुक्यात संजय जगताप तर भोर, वेल्हा, मुळशी या भागात संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी काम केले. मागील पंचवार्षिक निवडणुकीत आघाडीचा धर्म होता परंतु संग्राम थोपटे यांनी मनापासून काम केले नव्हते अशी तक्रार होती. निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी थोपटे कुटुंबीयांची भेट घेतली. ‘झालं गेलं विसरून जाऊ आणि पुढे जोमाने कामाला लागू’ असे म्हटले. त्यामुळे मागच्या पंचवार्षिक च्या तुलनेत यावेळी संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे साठी काम केले. 

दुसरीकडे अजित पवारांना सत्तेचा फायदा तर मिळालाच, शिवाय देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सहकार्यामुळे पुरंदरमधील त्यांचा शिरकाव सोपा बनला. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांनी यावेळी सुनेत्रा पवारांचे काम केल्याचे दिसले. दौंड मध्येही आजी-माजी आमदारांनी म्हणजेच राहुल कुल व रमेश थोरात यांनी त्यांची एकत्रित ताकद अजित पवार यांच्या पाठीशी उभा केल्याची दिसले. 

ही निवडणूक लक्षणीय ठरली ती गाठीभेटींनी
अनेक ठिकाणी शरद पवार आणि अजित पवारांनी अनेक जुन्या विरोधकांच्या भेटी घेतल्या. यामध्ये चंद्रराव तावरे, अनंत थोपटे, पृथ्वीराज जाचक, दादासाहेब जाधवराव, काकडे कुटुंबातील सदस्य, हर्षवर्धन पाटील यांच्या घरी जाऊन दोघांनी गाठी भेटी घेतल्या. आजपर्यंत ज्यांना विरोध केला अशा लोकांना पवार त्यांच्या घरी जाऊन भेटले.

नेत्यांविरोधात स्थानिकांत नाराजी
आता एवढे झाल्यानंतर देखील सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत व सुनेत्रा पवार यांच्या बाबतीतही काही कच्चे दुवे आढळून आले आहेत. अजित पवार यांनी पक्ष फोडला हे ग्रामीण भागातील मतदारांना पटलेले नव्हते. ग्रामीण भागातील लोक हा मुद्दा उघडपणे बोलून दाखवत होते. त्याचा काहीसा परिणाम मतदानात झाल्याचे दिसून येत आहे. गाव पुढाऱ्यांविषयी लोकांमध्ये नाराजी होती. त्याचाही काहीसा फटका अजित पवार यांना बसल्याचे दिसत आहे. अनेकदा अनेक लोकांची गर्दी झाली की विसंवाद तयार होतो. तो विसंवाद टाळण्याचा अजित पवार यांनी आटोकाट प्रयत्न केला. मात्र तरीदेखील या नेत्यांचे निवडक समर्थक वगळता इतर समर्थक फार मनापासून काम करताना दिसले नाहीत. 

सुप्रिया सुळे यांच्या बाबतही हाच मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. सुप्रिया सुळे यांची अपुरी यंत्रणा असल्यामुळे अनेक ठिकाणी माहितीपत्रके देखील पोहोचली नाहीत. अनेक ठिकाणी सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे सहानुभूती मोठ्या प्रमाणात असली, तरी ती सहानुभूती मतदान यंत्रापर्यंत नेणारी यंत्रणा तेवढी सक्षम नसल्याचे देखील दिसून आले. शरद पवार या एकाच नावाभोवती ही निवडणूक फिरत राहिली. सुप्रिया सुळे यांचा कच्चा दुवा म्हणजे अनेक कार्यकर्त्यांची नावे सुद्धा सुप्रिया सुळे यांना माहित नाहीत. इंदापूर, दौंड, खडकवासला या ठिकाणी सुप्रिया सुळेंची ताकद अपुरी होती.

निवडणुकीला भावनिक स्वरूप
एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवार यांना या निवडणुकीतील काही गमक माहीत असावे. म्हणूनच की काय त्यांनी पहिल्या दिवसापासून ही निवडणूक विकासाच्या भोवती फिरवत ठेवली. त्यांनी शेवटपर्यंत भावनिक होऊ नका असे आवाहन केले. ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत भावनिक स्तरावर जायला नको यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. मात्र शेवटच्या पाच ते सहा दिवसात या निवडणुकीला भावनिक स्वरूप यायचे ते आलेच. सुरुवातीला अजित पवारांनी भावनिक होऊ नका, असे म्हणत त्यांनीच ही निवडणूक भावनिकतेकडे नेली होती. ‘या निवडणुकीत मला जर मिठाचा खडा लागला तर मी पुढे विधानसभेला विचार करेल’ असे म्हटलं होतं. तसेच संपूर्ण कुटूंब माझ्या विरोधात प्रचार करेल असे सांगितले होते. कुटूंबाने जरी एकटे सोडलं तुम्ही म्हणजे कार्यकर्त्यांनी एकटे सोडू नये अशी भावनिक साद अजित पवारांनी घातली होती. शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या सांगता सभेसाठी गर्दी जमवण्यात आलो होती. 

मोदींच्या सभा झाल्या नाहीत
सगळ्यात लक्षणीय गोष्ट ठरली ती म्हणजे ती बारामती लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा न होणे. शेजारी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात मोदींच्या दोन सभा झाल्या. पण बारामती लोकसभा मतदारसंघात मोदींच्या आणि अमित शहा यांच्या सभा झाल्या नाहीत. जर मोदी किंवा अमित शहा यांची सभा झाली असती तर त्याचा उलटा परिणाम झाला असता. त्या कारणामुळे मोदींच्या सभा मतदारसंघात झाल्या नाहीत. शरद पवारांविरोधात जर कुणी बोललं तर त्याचा परिणाम सुनेत्रा पवारांच्या मतांवर होऊ शकतो असे सांगितले जाते. 

तसेच अजित पवारांनी भाजपच्या बड्या नेत्यांसोबत सभा घेतल्या नाहीत. चंद्रकांत पाटील बारामतीत आले तेव्हा शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार वाटतो असे वक्तव्य केलं होतं. त्याचं भांडवल सुप्रिया सुळे यांनी केलं आणि ते करणं विरोधक म्हणून स्वाभाविक आहे. शरद पवारांवर बाहेरून येऊन कुठल्या नेत्याने टीका केली तर ते अजित पवारांना परवडणारे नव्हते. पण अजित पवारांवर महाविकास आघाडीचे नेते टीका करीत होते. त्यामध्ये सगळ्यात आघाडीवर संजय राऊत होते.

सुरुवातीच्या काळात विकासाच्या मुद्द्यावर लोक अजित पवारांकडे झुकले होते. ते मोठ्या प्रमाणात झुकत आहेत असे दिसताच महाविकास आघाडीने भावनिक कार्ड खेळण्यास सुरुवात केली. शरद पवारांना या वयात त्यांचा पक्ष आणि चिन्ह गेलं, शरद पवारांना हरवणे भाजपला जास्त महत्वाचे असल्याचं, जे आजपर्यंत भाजपला जमले नाही ते घर फोडून त्यांनी केलं. उमेदवार सापडला नाही म्हणून घरातीलच उमेदवार दिला असे सांगून भावनिक करण्यात आले. हळूहळू त्याला धार आली आणि शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक भावनिकतेकडे वळाली.

आता मतदारांनी भावनिक मुद्द्यावर मतदान केले असेल तर त्याचा फायदा सुप्रिया सुळे यांना होऊ शकतो. मतदारांनी जर विकासाच्या मुद्द्यावर आपले मत दिले असेल त्याचा फायदा सुनेत्रा पवार यांना होऊ शकतो. अर्थात ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून या निवडणुकीतील विजयाचे अंतर फारसे असणार नाही. कोण बाजी मारते हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 11 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा स्वबळाचा नारा, स्वबळावर मनसेचं कधी किती बळ?Zero Hour  : जागावाटपाच्या चर्चेत शाहांचं वक्तव्य म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंवर दबावतंत्र?Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणूक : सुपरफास्ट बातम्या : 16 OCT 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
New Justice Statue : भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
Solaur vidhansabha : शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
आमदार सतिश चव्हाणांचे पत्र अत्यंत गंभीर; पक्षाकडून कारवाई होणार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
आमदार सतिश चव्हाणांचे पत्र अत्यंत गंभीर; पक्षाकडून कारवाई होणार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
Embed widget