Badlapur Station Protest : आम्ही सहन करणार नाही..बदलापूरकर आक्रमक; ठाण्याकडे कूच करण्याचा इशारा
Badlapur Station Protest : आम्ही सहन करणार नाही..बदलापूरकर आक्रमक; ठाण्याकडे कूच करण्याचा इशारा
Badlapur School Crime News: बदलापूरमधील एका नामांकित शाळेत घडलेल्या चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणानंतर बदलापूरकर नागरिकांनी रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झाले आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करताच रेल्वे प्रवाशांनी आणि आंदोलन करणाऱ्यांनी देखील दगडफेक करून उत्तर दिले.
बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार (Badlapur School Crime) करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी एकच मागणी नागरिकांनी लावून धरली आहे. मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं, पोलिसांनी देखील आवाहन केलं, मात्र तरीदेखील नागरिक आपलं आंदोलन मागे घ्यायला तयार नाही. सर्व विद्यार्थ्यांचे पालक, नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
ही बातमी पण वाचा
Badlapur School Case : बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल करायला 12 तास का लावले? पोलिसांकडून झालेला हा कसला हलगर्जीपणा, राज ठाकरेंचा सवाल
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे बदलापूरच्या घटनेबाबत म्हणाले की," बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या."