Atul Bhatkhalkar : राजभवनात जुनी कागदपत्र तयार होत आहेत तर पोलीस यंत्रणा काय करतेय?
Sanjay Raut on Kirit Somaiya : आयएनएस विक्रांत निधी प्रकरणावरुन सध्या राज्यातील राजकीय वातावरण चंगलेचं तापलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या हे एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. आयएनएस विक्रांत निधी गैरव्यवहार प्रकरणावरुन संजय राऊत यांनी आज पुन्हा किरीट सोमय्या यांना टीकेचं लक्ष्य केलंय. या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी आहे. या प्रकरणात सोमय्यांचे लोक राजभवनात जाऊन जुन्या तारखेची कागदपत्रं तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राजभवनानं अशा देशविरोधी कृत्यात सहभागी होऊ नये, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
आयएनएस विक्रांत निधी प्रकरणातील घोटाळा हा मोठा आहे. यातून बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत. मोठमोठ्या लोकांना धमकावून हे लोक पैसे काढत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर केला आहे. दिल्लीतून दबाबव आणून खोटी कागदपत्रे तयार करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयतन होत असल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे. न्यायालयात सत्याचा विजय होईल असेही ते म्हणाले. कालपासून किरीट सोमय्या यांच्या टोळीची माणसे राजभवनाकडे जात आहेत. जुन्या तारखेची कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं राजभवनानं या कृत्यामध्ये सामील होऊ नये अस राऊत म्हणाले.