Ashok Chavan - Manoj Jarange : शासन आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वयाची आवश्यकता - अशोक चव्हाण
Ashok Chavan - Manoj Jarange : शासन आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वयाची आवश्यकता - अशोक चव्हाण अशोक चव्हाण काय काय म्हणाले? आमचा सर्वांची इच्छा आहे हा विषय जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढा संपलेला बरा. आमच्या चर्चेत राजकीय चर्चेचा विषयच नव्हता. शासन आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वयाची आवश्यकता आहे. सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वय आवश्यक असून हा विषय लवकर संपवा अशी आमची भावना असल्याने संवाद होण्याच्या कारणाने आपण आल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. शनिवारपासून मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला सुरुवात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची शनिवारपासून शांतता रॅले सुरु होणार आहे. त्यापूर्वीच राज्यसरकार अॅक्शनमोडवर आलं आहे. येत्या सोमवारपासून शिंदे समिती हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहे. शिंदे समितीचा हा 4 दिवसांचा हैद्राबाद दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये शिंदे समिती मनोज जरांगेंच्या हैदराबाद गॅझेटच्या मागणीबाबत पुरावे गोळा करण्यात येणार आहेत. या कामात मदत करावी अशी विनंती राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी तेलंगणाच्या मुख्य सचिवांना पत्र देऊन केली आहे. 13 जुलैपर्यंत सरकारने सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही तर 288 उमेदवार पाडायचे की उभे करायचे याबाबत विचार करावा लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे.