(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Ekadashi Wari2021:माऊलींची पालखी घेऊन जाणारे शिवशाही बसचे चालक सोमनाथ होले यांना अश्रू अनावर
टाळ मृदुंगात ग्यानबा तुकारामचा गजर... रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या शिवशाही बस अशा वातावरणात मानाच्या १० पालख्या प्रस्थान ठेवताहेत. त्यात उद्या आषाढी एकादशी आहे. त्यामुळे मानाच्या पालख्या आज एसटीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवताहेत. ज्ञानोबा, तुकाराम माऊली, संत एकनाथ महाराजांच्या पालख्यांनी काही वेळापूर्वीच पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. संत मुक्ताई पालखी, संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यानं पहाटेचं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय. तर देवी रुक्मिणीची पालखी अमरावतीलल्या कौंडण्यपूरहून कालच पंढरीकडे रवाना झाली. दरवर्षी शेकडो दिंड्या, पालख्यांसोबत हजारो वारकरी पायी वारी करत पंढरीत दाखल होत असतात. पण यंदा कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी पायी वारी निघालेली नाही.. त्यामुळे मानाच्या १० पालख्यांनाच पंढरपूरला जाण्याची मुभा देण्यात आलीय. त्यासाठी प्रत्येक पालखीसोहळ्यासोबत ४० वारकऱ्यांना परवानगी आहे. पण त्यांना कोरोना चाचणीची अट कायम ठेवण्यात आलीए.