Asha Buchake Ajit Pawar :रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अजितदादांवर डागली तोफ,आशा बुचके पुन्हा आक्रमक
Asha Buchake Ajt Pawar :रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अजितदादांवर डागली तोफ,आशा बुचके पुन्हा आक्रमक
काळे झेंडे दाखवणाऱ्या भाजपच्या आशा बुचकेंना डिस्चार्ज, घरी येताच पुन्हा अजित पवारांवर डागली तोफ. ऍंकर : अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या भाजपच्या नेत्या आशा बुचकेंना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री म्हणून अजित पवारांवर तोफ डागली. अजित पवारांनी भाजपला डावलून घेतलेली जुन्नरच्या पर्यटनाची बैठक ही शासकीयचं होती. असा पुनरुच्चार बुचकेंनी केला अन पुरावा म्हणून तहसीलदारांच्या सहीने तयार झालेला बैठकीचा अजेंडा दाखवला. त्यामुळं माझा रोष हा जिल्हा प्रशासनावर आहे. हेच प्रशासन अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंच्या कारभाराला बळी पडत आहेत. आता पालकमंत्री यांच्यावर कारवाई करणार आहेत का? असा प्रश्न आशा बुचकेंनी थेट अजित पवारांना विचारला आहे. 18 ऑगस्टला जनसन्मान यात्रा जुन्नर विधानसभेत आली, तेंव्हा काळे झेंडे दाखवत बुचकेंनी चांगलाच राडा घातला होता. या राड्यानंतर उच्च दाबाच्या त्रासाने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. मात्र डिस्चार्ज मिळताच त्यांनी पालकमंत्री अजित पवारांविरोधात पुन्हा हल्लाबोल केला.