एक्स्प्लोर

DCM Devendra Fadanvis : लवकरच एक कोटी बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार - देवेंद्र फडणवीस

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारनं सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेची (Ladki Bahin Yojana) सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या योजनेअंतर्ग तपात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात यायला देखील सुरुवात झाली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी दिली. पहिल्या टप्प्यात राज्यातील 1 कोटी महिलांना लाभ मिळणार आहे. तर नागपूर जिल्ह्यात 5 लाख महिलांना याचा फायदा होणार असून, ही योजना सुरुच राहणार असल्याचे फडणवीस म्हणाले.  

नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यलयात पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमात विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर, नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल व इतर गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. यावेळी फडणवीस बोलत होते. 

लाडकी बहिण योजनेतून महिलांना 1500 रुपये यायला सुरुवात

अनेक शुर विरांनी बलिदान देत भारताला स्वातंत्र्य मिळवूनं दिलं असल्याचे फडणवीस म्हणाले. भारत हा सध्या जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था असणार देश आहे. भारताचा हा थक्क करणारा प्रवास असल्याचे फडणवीस म्हणाले. स्वातंत्र्य दिनानिमित्त मी स्वातंत्र्य सैनीकांना अभिवादन करतो असेही ते म्हणाले. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसीत भारत अशी थीम ठेवली आहे असं ते म्हणाले. समृद्धी महामार्ग, विकासाचे अनेक प्रकल्प, 50 हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक हे विकास दर्शवणारं चित्र असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच लाडकी बहिण योजनेतून महिलांना 1500 रुपये यायला सुरुवात झाली आहे. कालपासून पैसे द्यायला सुरुवात झालीय. राज्यात एक कोटी महिलांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळेल असे फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांना मोफत वीज, मुलींना मोफत शिक्षण दिलं

शेतकऱ्यांना मोफत वीज, मुलींना मोफत शिक्षण, सौर घर योजनेतून 300 युनीटपर्यंत मोफत वीज सरकारनं दिल्याचे फडणवीस म्हणाले. विभागीय क्रीडा संकुलाला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा, क्रीडा विद्यापीठात त्याचं रुपांतर करणार असल्याचे ते म्हणाले. आपल्या अधिकाराबाबत आपण चर्चा करतो, तेव्हा कर्तव्याबतंही चर्चा करणं गरजेचं आहे. कचरा केला नाही, तर तेही आपलं कर्तव्य पार पाडता येईल. आमचा तिरंगा फडकत राहीला पाहिजे, हा निर्धार करु. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करु असेही फडणवीस म्हणाले.  

महाराष्ट्र व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!
Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget