Anil Parab and Yashwant Jadhav ED : निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेचे दोन महत्वाचे शिलेदार अडचणीत
मुख्यमंत्र्यांचे विश्वासू अशी ओळख असलेले आणि शिवसेनेतल्या बड्या नेत्यांमध्ये ज्यांची गणना होते ते अनिल परब ईडीच्या रडारवर आलेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित ७ ठिकाणी ईडीनं सकाळपासून छापेमारी सुरु केली आहे. ज्यात अनिल परब यांचं शासकीय निवासस्थान अजिंक्यतारा आणि वांद्र्यातील राहतं घर याशिवाय मुंबई, पुणे आणि रत्नागिरीतील इतर मालमत्तांचा समावेश आहे... मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीनं ही छापेमारी सुरु केल्याचं समजतंय.. मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणी ईडीनं टाकलेल्या छाप्यामागे सचिन वाझे कनेक्शन असल्याची माहितीही मिळतेय. पोलीस बदल्यांप्रकरणी सचिन वाझे यांनी दिलेल्या जबाबात अनिल परब यांचं नाव घेतलं होतं. तसंच अवैध संपत्तीतून दापोलीतील रिसॉर्ट विकत घेतल्याचा अनिल परबांवर आरोप आहे. या दोन्ही प्रकरणी ईडीनं अनिल परबांच्या मालमत्तांवर छापेमारी केल्याची माहिती मिळतेय.