एक्स्प्लोर

"विकीच्या आवाजात दम नाही, शरद केळकर हवा होता", 'छावा'साठी विकी कौशलची निवड प्रेक्षकांना नापसंत, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Chhaava Movie Controversy : छावा चित्रपटातील विकी कौशलच्या भूमिकेचं काही नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे, तर काहींनी त्यावर टीका करत भूमिकेसाठी निवड चुकल्याचं म्हटलं आहे.

Netizens Response on Chhaava Trailer : छावा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादात सापडला आहे. चित्रपटाचा टीझर आणि डायलॉगवरुन प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे टीझरमध्ये छत्रपती शंभूराजे आणि येसूबाई नाचताना दाखवल्याने शिवप्रेमींनी निषेध केला आहे. छावा चित्रपटाचा ट्रेलर काही नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला असून त्यांनी विकीचं कौतुक केलं आहे. दरम्यान, आता चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकी कौशलची निवड चुकीची असल्याचंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत विकी कौशलच्या आवाजाबद्दलही निगेटिव्ह प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'छावा'मध्ये विकी कौशलच्या भूमिकेला निगेटिव्ह प्रतिसाद

छावा चित्रपटात विकी कौशलची निवड केल्याबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिलंय, "विकीच्या आवाजात दम नाही, शरद केळकर हवा होता... छत्रपती शंभूराजेंसाठी भारदस्त आवाजच हवा". दुसऱ्याने लिहिलंय, "हे सर्व काय आहे? विकी कौशलला का घेतलं? सुबोध भावेला घ्यायला हवं होतं." आणखी एकाने लिहिलंय, "शरद केळकरचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कॅमिओ करा".

'या' डायलॉगवरुनही नेटकरी संतापले

या चित्रपटातील 'हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा' या डायलॉगवरुनही नेटकऱ्यांनी टीका केली आहे. एका नेटकऱ्यानं कमेंटमध्ये लिहिलंय, "महाराजांचा इतिहास जागवणे, इतिहास दाखवणे, घडलेला गोष्टी सर्व जनतेपरंत पोहचवणे हे कार्य काम खूप चांगलं आहे परंतु या मध्ये घेतलेलं काही हे चुकीचे आहे आणि ते दुरुस्त करणे देखील अतिगर्जेचे आहे. विकी कौशल आपल्याला इतिहास जपायचं आहे, काय घडलेलं आहे, हे दाखवायचं आहे, पण इतिहासात बदल होईल असं करून नाही". 

मूळ इतिहास अन् शब्दात बदल नको

दुसऱ्या एका युजरने कमेंटमध्ये म्हटलंय, "छावा चित्रपटासाठी हा नक्कीच उत्साही आहे! महाराज शंभूछत्रपतींचा इतिहास अजरामर आहे, येणाऱ्या हजारो पिढ्यांना तो कळायलाच हवा, या सोबतच एक गोष्ट मला विषेशतः निदर्शनास आणून द्यायची आहे की, या चित्रपटात 'हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा' हा डायलॉग निव्वळ कथित आहे. इतिहासात नोंद असलेला, सोन्याहून पिवळा, खरा डायलॉग हा 'हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा' असा आहे. महाराजांच्या इतिहासावर चित्रपट यावे, अधिक यावे, पण मूळ इतिहास किंवा शब्दामधे बदल करू नये. हे वाक्य आम्ही लहानपणापासून ऐकत आले आहोत".

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Chhaava Controversy : "दैदिप्यमान इतिहासाला कुठेही गालबोट... "; छावा चित्रपटातील 'त्या' आक्षेपार्ह सीनवर अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : नाशिक अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून आर्थिक मदत; गिरीश महाजनांनी धनादेश सुपूर्द करताच कुटूंबियांना अश्रू अनावर
नाशिक अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून आर्थिक मदत; गिरीश महाजनांनी धनादेश सुपूर्द करताच कुटूंबियांना अश्रू अनावर
Tilak Varma : टी-20 क्रिकेटमध्ये नाबाद 338 धावांचा पाऊस! तिलक वर्माचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असाही भीम पराक्रम
टी-20 क्रिकेटमध्ये नाबाद 338 धावांचा पाऊस! तिलक वर्माचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असाही भीम पराक्रम
Mumbai Local Train: कर्नाक पुलाच्या गर्डर लॉचिंगचं काम लांबलं, रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा, मध्य रेल्वे दादरपर्यंतच
मुंबईकरांना मनस्ताप! एक्स्प्रेस ट्रेन रखडल्या, मध्य रेल्वे दादरपर्यंतच, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Bharat Gogawale : रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mohan Bhagwat Bhiwandi Full Speech : प्रजासत्ताक दिनानिमित्त मोहन भागवत यांचं भिवंडी येथे भाषणNarhari Zirwal On Hingoli Gurdian Minister : गरीब आहे म्हणून गरीब जिलह्याचं पालकमंत्रिपद दिलं- नरहरी झिरवाळMega Block At Central Railway : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक अजून सुरुच, प्रवाशांचे हालABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : नाशिक अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून आर्थिक मदत; गिरीश महाजनांनी धनादेश सुपूर्द करताच कुटूंबियांना अश्रू अनावर
नाशिक अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून आर्थिक मदत; गिरीश महाजनांनी धनादेश सुपूर्द करताच कुटूंबियांना अश्रू अनावर
Tilak Varma : टी-20 क्रिकेटमध्ये नाबाद 338 धावांचा पाऊस! तिलक वर्माचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असाही भीम पराक्रम
टी-20 क्रिकेटमध्ये नाबाद 338 धावांचा पाऊस! तिलक वर्माचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असाही भीम पराक्रम
Mumbai Local Train: कर्नाक पुलाच्या गर्डर लॉचिंगचं काम लांबलं, रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा, मध्य रेल्वे दादरपर्यंतच
मुंबईकरांना मनस्ताप! एक्स्प्रेस ट्रेन रखडल्या, मध्य रेल्वे दादरपर्यंतच, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Bharat Gogawale : रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
Dyanradha Fraud Update: ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी,  मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी, मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
Narhari Zirwal : गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
Embed widget