Anand Nirgude Resignation:सरकार आयोगाला गृहीत धरत होतं,मागासवर्ग आयोग माजी सदस्य किल्लारीकरांचा आरोप
Anand Nirgude Resignation : सरकार आयोगाला गृहीत धरत होतं , मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य किल्लारीकरांचा आरोप
नागपूर : संपूर्ण समजाचे आरक्षण झाले पाहिजे आणि तुलनात्मक अभ्यासाच्या आधारावर मराठा समाजाचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मान्य केली होती. मात्र, याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा आक्षेप होता. तसेच, गोखले इन्स्टिट्यूट यांच्या मार्फतच हे काम गेले पाहिजे. तर, मराठा समाजाचा संक्षिप्त सर्वेक्षण करावा, व्यापक स्वरूपात सर्वेक्षण होऊ नयेत. जेणेकरून हे सर्वेक्षण लवकर होईल, असे फडणवीस यांचे मत होते, असा गौप्यस्फोट मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिलेले सदस्य बालाजी किल्लारीकर (Balaji Killarikar) यांनी केलाय.
मात्र, यामागे नेमकं काय राजकारण होते याची आम्हाला माहिती नाही. पण, संपूर्ण डेटा शिवाय मागासवर्ग आयोग सर्वेक्षण करू शकत नाही, आणि ते कोर्टात टिकू शकणार नाही. हा आयोगाच्या अधिकारात हस्तक्षेप असल्याने राजीनामा सत्र सुरू असल्याची माहिती किल्लारीकर यांनी दिली आहे. तसेच, सरकार आयोगाला गृहीत धरत होता, राजकारण्यांनी मतांसाठी आयोग वापरू नये, आयोग त्यासाठी नाही असेही किल्लारीकर म्हणाले.