Amravati Corona test | लॅब टेक्निशियनवर कडक कारवाई होण्यासाठी प्रयत्न करणार : खासदार नवनीत राणा
कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार अमरावतीमध्ये घडला आहे. बडनेरा पोलिसांनी मंगळवारी (28 जुलै) रात्री कोविड लॅबमध्ये टेक्निशिअन म्हणून काम करणाऱ्या अल्पेश अशोक देशमुख (वय 30 वर्षे) नावाच्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कार, अॅट्रॉसिटी, आयटी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित तरुणी अमरावतीमध्ये भावाकडे राहत असून एका मॉलमध्ये नोकरी करते. मॉलमधील कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे 28 जुलै रोजी ट्रामा केअर टेस्टिंग लॅबमध्ये त्याच्या संपर्कातील 20 जणांचे स्वॅब घेण्यात आले. मात्र स्वॅब घेणाऱ्या अल्पेश देशमुखने तक्रारदार तरुणीला परत बोलावलं आणि "तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली असून युरिनल तपासणी करावी लागेल," असं सांगितले.





















