Amravati Corona : अमरावतीत कोरोनाच्या नियमांचा जनतेकडून फज्जा, मार्केटमध्ये तुफान गर्दी
राज्यात कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याने राज्य सरकारनं रात्रीपासूनच नियमावली लागू केलीय. पण या नियमावलीचं खरच पालन होतंय का, हे पाहण्यासाठी आपण जाऊया अमरावती शहरात. अमरावती मध्ये नियम कशे धाब्यावर आहेत हे या दृष्यावरून दिसेल. अमरावती येथील भाजी बाजार होलसेल मार्केट मधील हे दृश्य पाहल्यावर तुमच्या लक्षात येईल की, नियमाची कशी पायमल्ली होतेय ती, याठिकाणी कोणीही मास्क घातलेला दिसत नाहीये. त्यामुळे यांच्यावर आता कोण कारवाई करणार असा प्रश्न पडला आहे. अमरावती जिल्ह्यात 1 जानेवारीपासून कोरोनाच्या आकड्यात झपाट्यात वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पूर्ण जनजागृती केली पण अमरावती करांनी ती पाळणं गरजेचं आहे अन्यथा अमरावती जिल्ह्यात कोरोनाला आपला पाय पसरायला वेळ लागणार नाही.



















