एक्स्प्लोर

Gold Rate Today : सोने आणि चांदीच्या दरात तेजी, MCX वर दर वाढले, जाणून घ्या मुंबईसह प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर

Gold Price Today: गुरुवारी (14 ऑगस्ट) सोने आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे दर 92,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 1,01,340 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.

Gold Price Today: अमेरिकेतील महागाईची आकडेवारी, डॉलर निर्देशांकातील कमजोरी आणि सप्टेंबरमध्ये फेड रिझर्व्ह कडून व्याज दरात कपात करण्याची शक्यता वाढल्यानं गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा दर 92,890 रुपये प्रति 10 ग्र आणि 24 रेट सोन्याचा दर 1,01,340 रुपये प्रति 10 ग्र पर्यंत पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीचा दर 1,14,900 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोने आणि चांदीचे दर

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 5 सप्टेंबर 2025 ला संपणाऱ्या सोने वायद्याचे एका तोळ्याचे दर 0.03 टक्क्यांनी वाढून 100219 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, 5 सप्टेंबरला संपणाऱ्या चांदीच्या वायद्याच्या दरात देखील 0.17 टक्क्यांची वाढ होऊन ते एक किलोसाठी 115220 रुपयांवर पोहोचले आहेत.

देशातील विविध शहरातील सोन्याचे दर

मुंबई, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद आणि कोलकाता या सारख्या प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 101340 रुपयांर पोहोचले आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 92890 रुपयांवर पोहोचला आहे. अहमदाबाद आणि पाटणा शहरातील 24 कॅरेट सोन्याचा दर 101390 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 92940 रुपये झाला आहे.जयपूरमधील 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 101490 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 93040 रुपये आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळाले. सोन्याच्या या वाढत्या किमतीला अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून सप्टेंबरमध्ये व्याज दरांमध्ये कपात होण्याचे संकेत असल्यानं बळ मिळालं. महागाईचा दर कमी झाल्यानं डॉलरवर दबाव देखील वाढला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात हाजिर सोन्याचे दर 0.4 टक्क्यांनी वाढून 3,367.53 डॉलर प्रति औंस वर पोहोचले होते. तर, अमेरिकेतील सोने वायदे 0.3 टक्क्यांनी वाढून 3416.70 डॉलर वर पोहोचले आहेत. अमेरिकेच्या डॉलरमध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण होत असल्यानं इतर चलनांमध्ये व्यवहार करणाऱ्यांसाठी सोनं महागलं आहे.

अमेरिकेचा 10 वर्षांच्या ट्रेजरी यील्ड एका आठवड्याच्या निचांकी पातळीवर आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून टॅरिफ वाढवलं जात असल्यानं पुढच्या महिन्यात व्याज दरात कपातीच्या अपेक्षा वाढल्या आङेत. ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी व्याज दरात 50 बेसिस पॉईंटची कपात होण्याची शक्यता आहे.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget