Amol Kolhe Meet Ajit Pawar : अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीला, संपूर्ण राज्याचं भेटीकडे लक्ष
Amol Kolhe Meet Ajit Pawar : अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीला , पवार गटातील खासदारांना अपात्र करण्याची अजित पवार गटाची मागणी
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष फुट प्रकरणानंतर आता आमदार-खासदारांच्या निलंबणाची मागणी दोन्ही गटाकडून केली जात आहे. अशातच अजित पवार गटातील खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करावं या मागणीसाठी शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने राज्यसभा सभापती जगदीप धनगड यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटाने देखील शरद पवार गटातील खासदारांना निलंबित करावे यासाठी मागणी केली आहे. विशेष करून अजित पवार गटाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नाव वगळण्यात आलंय. यातच आता अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे...























