Akshay Shinde Encounter : फाशी द्या म्हणणारे विरोधक आता आरोपीची बाजू घेत आहेत; अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटवर शिंदेचा सवाल
Akshay Shinde Encounter : फाशी द्या म्हणणारे विरोधक आता आरोपीची बाजू घेत आहेत; अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटवर शिंदेचा सवाल
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. या चकमकीत एका पोलिसालाही गोळी लागली आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली असून राजकीय नेतेही या घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्यावेळी या लहान मुलीवर अन्याय झाला, त्यावेळी विरोधक सांगत होते याला फाशी द्या, आता तिचं विरोधक आरोपीची बाजू घेत आहे. ज्याने माणुसकीला काळिमा फासणारी कृत्य केले, अश्या आरोपीची बाजू घेणे म्हणजे निंदाजनक आहे. त्याचा निषेध करावा.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या घटनेची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी करत अनेक सवाल उपस्थित केले.
या घटनेमुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत....
1. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही ?
2. फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का ?
3. हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का? या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात 13 ऑगस्ट 2024 रोजी एका शाळेत बलात्काराची घटना घडली. जिथे शाळेत काम करणाऱ्या सफाई अक्षय शिंदेने दोन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने सर्व प्रकार तिच्या पालकांना सांगितला. याबाबत पालकांनी तात्काळ शाळा प्रशासनाला माहिती दिली, मात्र शाळेने याकडे दुर्लक्ष केले. 15 दिवसांपासून सीसीटीव्ही बंद असल्याचे शाळेने सांगितले.