Akbaruddin Owaisi Bhiwandi:समाजवादी पार्टी महाराष्ट्रात भाजपाची एजंट म्हणून काम करते - ओवैसी
Akbaruddin Owaisi Bhiwandi:समाजवादी पार्टी महाराष्ट्रात भाजपाची एजंट म्हणून काम करते - ओवैसी
मुस्लिमांच्या घरावर बुलडोझर चालवले जातात याला जबाबदार फक्त भाजपा व आर एस एस नसून काँग्रेस ही त्यास जबाबदार आहे .त्यांची नाकामी बेजबाबदार पणा कारणीभूत आहे.काँग्रेसने वेळेवर गुन्हेगारांना जेल मध्ये टाकले असते तर आम्हाला हे दिवस बघण्याची वेळ नसती.आली.बेरोजगारी,पाणी,
महागाई,वीज ,आरोग्य सेवा या देशाच्या समस्या आहेत.पण मोदी यावर कधीच बोलत नाहीत.तर ते बोलतात फक्त नफरत व तणाव निर्माण होण्यावर.मोदींनी नारा दिला एक हो गे तो सेफ होगे.यामध्ये त्यांनी ओबीसी दलित आदिवासी यांना एक होण्याचा संदेश दिला पण त्यामध्ये मुसलमानाचा समावेश त्यांनी नाही केला.
आम्हाला त्यांना सेफ नाही करायचे का सबका साथ सबका विकास चा नारा देणाऱ्या भाजपाने आम्हाला साथ दिली का असा प्रश्न उपस्थित करीत भाजपावर टीका केली.तर योगी आदित्यनाथ यांच्या बटोगे तो कटोगे यावर सुध्दा त्यांनी टीका केली. ना खाऊंगा ना खाने दुंगा बोलणाऱ्यांनी हजारो कोटी खाल्लेल्या अजित पवार यांच्या वर अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवली.मुस्लिमांवर अनेक अत्याचार भाजपा सरकारने महाराष्ट्रात केले.मग हिजाब बंदी,रेल्वेत गोवंश मांस घेऊन जाणाऱ्यास मारहाण होते.बिफ एक्स्पोर्ट करणाऱ्यांकडून मोदी भाजपाने इलेक्ट्ररोल बॉण्ड च्या माध्यमातून देणग्या घेतल्या. समाजवादी पार्टी महाराष्ट्रात बीजेपी ची एजंट म्हणून काम करत आहे असा धक्कादायक आरोप अकबरुद्दीन ओवेसी यांनी केला.