(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar Candidate List Declare : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Ajit Pawar Candidate List Declare : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
राज्यातील विधानसभा निवडणूक एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील 288 मतदारासंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजताच आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये 38 उमेदवारांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आज आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांना परळीतून, दिलीप वळसे पाटील यांना, आंबेगावमधून आशुतोष काळे यांना, कोपरगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे.