IT Raid : जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणाऱ्या टीकेनंतर उद्या अजित पवार यांची पत्रकार परिषद
जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणाऱ्या टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विरोधकांना इशारा दिला आहे. राज्यात केवळ जरंडेश्वर हा एकमेव कारखाना नाही आणि कोणते कारखाने कोणी कितीला विकत घेतले याची माहिती आपण उद्या पत्रकार परिषद घेऊन देऊ, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. आपल्या नातेवाईकांची बदनामी केली जात असल्याची खंतही त्यांनी यावळी व्यक्त केली तर काहींकडून मला बदनाम करण्यासाठी माझ्याविरुद्ध गरळ ओकली जाते असं अजित पवार म्हणाले. मी बेईमान आहे की काय ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे....मी बेईमानी कधी केली नाही, ते आमच्या रक्तात नाही...अशा शब्दात आरोप करणाऱ्यांना अजित पवारांनी इशारा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या



















