(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar Kolhapur Speech:विरोधात असतानाही इतकी मस्ती कसली? नाव न घेता दादांची सतेज पाटलांवर टीका
Ajit Pawar Kolhapur Speech:विरोधात असतानाही इतकी मस्ती कसली? नाव न घेता दादांची सतेज पाटलांवर टीका
महाराष्ट्राचे सूत्र कोणाच्या हाती द्यायची याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला घ्यायचा आहे महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे महायुतीच्या सरकारने कोणत्याही घटकाला वंचित ठेवलं नाही महायुतीच्या वतीने काम करणारे चांगले तगडे उमेदवार दिले आहेत महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही सर्वांनी समन्वय साधला आहे लोकसभेला झालेल्या काही चुका आम्ही यावेळी टाळल्या आहेत या जिल्ह्यासाठी जे जे मागितलं ते आम्ही केला आहे विरोधक वाटेल तसे आरोप करत आहेत लोकसभेप्रमाणे आता देखील खोटा नेरेटिव्ह सेट करत आहेत हे सरकार राज्यातील उद्योग इतर राज्यात पाठवतो हा आरोप खोटा आहे काहीजण म्हणतात यांनी हे चोरलं त्यांनी ते चोर इथं कुणीही चोरा चोरी करत नाही कोर्टाच्या निर्णयाचे पालन होत आहे नागरिकांना भावनिक करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय काल छत्रपती घराण्याचा अपमान करण्यात आला विरोधात असताना देखील इतकी मस्ती कसली आहे छत्रपती घराण्याचा अपमान करण्याचा अधिकार कुणी दिला राज्यभर आम्हाला लाडक्या बहिणी राखी बांधत आहेत, ओवळत आहेत लाडकी बहीण ही सगळ्यात लोकप्रिय योजना झाली आहे आम्ही शेतकऱ्यांचे वीज मोफत केले आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत समोरची लोकं या योजना बंद करायला निघाले आहेत आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आम्हाला प्रशासन कसं चालवायचं याचा अनुभव आहे कोल्हापुरातील आमच्या 10 उमेदवारांना विजयी करा