एक्स्प्लोर

Ajit Pawar at NCPA : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलं रतन टाटांच्या पार्थिवाचं दर्शन

Ajit Pawar at NCPA : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलं रतन टाटांच्या पार्थिवाचं दर्शन

भारतीय उद्योगविश्वाचे महर्षि रतन टाटा (Ratan Tata) यांचं निधन झालंय. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात रतन टाटांनी जगाचा निरोप घेतला. रतन टाटा यांनी उद्योग विश्वात आपल्या अतुलनीय योगदानाचा अमूल्य ठसा उमटवलाय. रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतीय उद्योगविश्वाचा आधारवडच हरपलाय. परोपकारी स्वभाव, सामाजिक जाणीव यामुळे रतन टाटा हे सर्वच स्तरातील लोकांसाठी आदर्श व्यक्तिमत्व होते. 

1991 ते 2012 या काळात टाटा समूहाचे अध्यक्ष राहिलेले रतन टाटा हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जायचे. रतन टाटा हे केवळ चांगले उद्योगपतीच नव्हते, तर ते एक चांगले माणूसही होते. त्याच्यासोबत काम करणाऱ्या लोकांची ते खूप काळजी घ्यायचे, याचे अनेक किस्से आपण नेहमीच ऐकतो. नेहमी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा माणूस ही त्यांची ओळख होती. कंपनीमध्ये कर्मचारी कोणत्या पदावर आहे, हे त्यांच्यासाठी कधीच महत्त्वाचं नव्हतं, पण तो माणूस आहे, हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं.  एक किस्सा सांगितला जातो की, रतन टाटा एकदा आपल्या कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतः विमान उडवायला तयार झाले होते. 

2004 ची ही घटना. पुण्यातील टाटा मोटर्सचे एमडी प्रकाश एम तेलंग यांची अचानक तब्येत खालावली. त्यांना आधी पुण्यातल्या रुग्णालयात दाखल केलं. पण, डॉक्टरांनी त्यांना तातडीनं मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. रविवार असल्यानं डॉक्टरांना एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करणं शक्य नव्हतं. याबाबत रतन टाटा यांना सांगितल्यावर त्यांनी कंपनीचं विमान स्वतः उडवण्यास होकार दिला. रतन टाटा यांच्याकडे पायलटचा परवाना होता. पण, त्याचवेळी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाली आणि प्रकाश यांना तातडीनं उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. दरम्यान, तब्बल 50 वर्ष टाटा मोटर्समध्ये काम केल्यानंतर प्रकाश 2012 मध्ये निवृत्त झाले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात 29 सप्टेंबरला ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ'चं आयोजन
Maharashtra Breaking LIVE: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात 29 सप्टेंबरला ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ'चं आयोजन
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: ज्याला देव मान्य नाही… त्याच्याच घरात बाप्पा आणण्याचा स्वामींचा हट्ट; समर्थांची अगाथ लीला, काय घडणार?
ज्याला देव मान्य नाही… त्याच्याच घरात बाप्पा आणण्याचा स्वामींचा हट्ट; समर्थांची अगाथ लीला, काय घडणार?
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंनी मराठा महिला आंदोलकांना मास्टरप्लॅन सांगितला, म्हणाले, 'मुंबईत शिंदे अन् फडणवीसांचं घर गाठा, अमृताताई अन् लताताईंना हळदी-कुंकू लावा...;
मनोज जरांगेंनी मराठा महिला आंदोलकांना मास्टरप्लॅन सांगितला, म्हणाले, 'मुंबईत शिंदे अन् फडणवीसांचं घर गाठा, अमृताताई अन् लताताईंना हळदी-कुंकू लावा...;
IND vs AFG LIVE Streaming : ना JioHotstar, ना Sony LIV...; मग भारत-अफगाणिस्तान पहिली टी-20 मॅच नक्की LIVE कुठे पाहायची? जाणून घ्या A टू Z
ना JioHotstar, ना Sony LIV...; मग भारत-अफगाणिस्तान पहिली टी-20 मॅच नक्की LIVE कुठे पाहायची? जाणून घ्या A टू Z

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंनी मराठा महिला आंदोलकांना मास्टरप्लॅन सांगितला, म्हणाले, 'मुंबईत शिंदे अन् फडणवीसांचं घर गाठा, अमृताताई अन् लताताईंना हळदी-कुंकू लावा...;
मनोज जरांगेंनी मराठा महिला आंदोलकांना मास्टरप्लॅन सांगितला, म्हणाले, 'मुंबईत शिंदे अन् फडणवीसांचं घर गाठा, अमृताताई अन् लताताईंना हळदी-कुंकू लावा...;
Repo Rate : गृहकर्जदारांना धक्का बसणार,RBI ऑक्टोबरमध्ये रेपो रेट वाढवणार, एसबीआयच्या रिपोर्टमध्ये अंदाज, EMI वाढणार 
गृहकर्जदारांना धक्का बसणार,RBI ऑक्टोबरमध्ये रेपो रेट वाढवणार, एसबीआयच्या रिपोर्टमध्ये अंदाज, EMI वाढणार 
Laxman Hake on Manoj Jarange : जरांगे तुझी नौटंकी फार झाली; तीन वर्ष महाराष्ट्र तुला सहन करतोय आता बास..., लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, 'मीही मेंढपाळाचा पोर...'
जरांगे तुझी नौटंकी फार झाली; तीन वर्ष महाराष्ट्र तुला सहन करतोय आता बास..., लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना इशारा, म्हणाले, 'मीही मेंढपाळाचा पोर...'
Manoj Jarange: पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही,जिथं अडवाल तिथं...: मनोज जरांगे
पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही : मनोज जरांगे
BRICS Summit 2026 : सात वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात; स्वागताला पोहोचले केंद्रीय राज्यमंत्री, राष्ट्राध्यक्ष जिनपिंग अन् मोदींसोबतच्या द्विपक्षीय बैठकीत तणाव मिटवण्यावर भर
सात वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात; स्वागताला पोहोचले केंद्रीय राज्यमंत्री, राष्ट्राध्यक्ष जिनपिंग अन् मोदींसोबतच्या द्विपक्षीय बैठकीत तणाव मिटवण्यावर भर
EPF Advance New Rules: पीएफ खात्यातून ॲडव्हान्स म्हणून किती वेळा पैसे काढता येणार? ईपीएफओकडून नव्या नियमांची अपडेट जारी
पीएफ खात्यातून ॲडव्हान्स म्हणून किती वेळा पैसे काढता येणार? ईपीएफओकडून नव्या नियमांची अपडेट जारी
Bachchu Kadu : निसर्गाच्या कुशीत फिरले, खाण्याचाही आनंद लुटला, सह्याद्रीच्या कुशीत बच्चू कडूंचा साहसी अनुभव; लिंग्या वॉटरफॉलवर केले वॉटरफॉल रॅपलिंग
निसर्गाच्या कुशीत फिरले, खाण्याचाही आनंद लुटला, सह्याद्रीच्या कुशीत बच्चू कडूंचा साहसी अनुभव; लिंग्या वॉटरफॉलवर केले वॉटरफॉल रॅपलिंग
Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंचा मराठा मोर्चा मुंबईत धडकणार, कोणत्या तारखेला आणि मार्गाने जाणार, वाचा ए टू झेड माहिती
मनोज जरांगेंचा मराठा मोर्चा मुंबईत धडकणार, कोणत्या तारखेला आणि मार्गाने जाणार, वाचा ए टू झेड माहिती
Embed widget