Ajit Pawar : अजितदादांकडून 'चर्चांना' पूर्णविराम; मविआचे नेते म्हणतात...
महाराष्ट्राच्या राजकारणाला आज सकाळपासून एका मोठ्या राजकीय भूकंपाचे वेध लागले होते... आणि त्या भूकंपाचं केंद्र विधान भवनात विरोधी पक्षांच्या कार्यालयात होतं... त्यामुळे सकाळपासून फक्त एकाच नावाभोवती राजकीय मंथन होत होतं.. ते म्हणजे अजित पवार... अजित पवार महाविकास आघाडीपासून नॉट रिचेबल होऊन मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आणि सकाळपासून उलटसुलट चर्चा रंगत होत्या.... सत्ताधारी गोटात अनेकांचे रक्तदाबही वरखाली झाले.... प्रत्यक्षात अजितदादांनी माध्यमांसमोर येऊन जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा अनेकांची तोंडं उघडीच्या उघडीच राहिली... आपल्याभोवती सकाळपासून होत असलेल्या चर्चा या फक्त वावड्या आहेत. आणि गैरसमजातून निर्माण झाल्या आहेत... जीवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादीत आहोत असं अजित पवारांनी स्पष्ट केलं... आणि तळ्यात-मळ्यातचे कयास बांधणाऱ्या अनेकांचे जीव भांड्यात पडले...


















