एक्स्प्लोर

Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

Parner Bhondu Baba Case : एवढे पैसे देऊन आणि होमहवन करूनही मुलाच्या प्रकृतीत काहीच फरक पडत नसल्याने आणि उलट छळ वाढत असल्याने महिलेला आपली मोठी आर्थिक व शारीरिक फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

Parner Fake Baba Case : गतिमंद मुलाचा आजार पूर्णपणे बरा करण्याचं आणि भावाचं लग्न जमवून देण्याचं खोटं आमिष दाखवून एका भोंदू बाबाने हतबल कुटुंबाची तब्बल साडेसहा लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पारनेरमध्ये उघडकीस आला. ही केवळ आर्थिक फसवणूक नसून, या नराधम भोंदू बाबाने मुलाला जिवंत मारण्याची धमकी देऊन पीडित महिलेवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचीही अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात मुख्य भोंदू बाबा, त्याचा मुलगा आणि एका महिला साथीदाराविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Parner Superstition Fraud Incident : कौटुंबिक अडचणींचा गैरफायदा

पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या 40 वर्षीय पीडित शेतकरी महिलेचा 17 वर्षांचा मुलगा हा मतिमंद आहे. अनेक ठिकाणी वैद्यकीय उपचार करूनही त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. त्यातच शेतीत चांगले पिके येऊनही घरातील कर्ज फिटत नव्हते आणि गरिबी हटत नव्हती. 

याच दरम्यान पीडितेचा सख्खा भाऊ याचेही वय झाले तरी त्याचे लग्न जमत नव्हते. अशा अनेक कौटुंबिक अडचणींनी खचलेल्या या महिलेला पारनेर तालुक्यातील रुई छत्रपती येथील राजू दिवटे, त्याचा मुलगा शशिकांत दिवटे आणि त्यांची महिला सहकारी शोभा तरटे हे देवऋषी (देवभगत) असून ते कोणत्याही संकटावर हमखास तोडगा काढतात, अशी अंधश्रद्धेतून खोटी माहिती मिळाली होती.

Mandhardevi Kalubai Ritual : मांढरदेवी काळुबाईच्या बाधेची भीती

पीडितेने वर्ष 2020 मधील कोरोना काळापासून या भोंदूबाबाकडे आपल्या समस्या घेऊन जाण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी पीडितेची हतबलता ओळखून संशयित भोंदूबाने, 'तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मांढरदेवीच्या काळुबाईची मोठी बाधा आहे, ती घालवण्यासाठी घरात होमहवन आणि मोठी पूजा करावी लागेल,' असं सांगून भीती घातली. 

मुलाच्या तांत्रिक उपचारासाठी 3 ते 4 लाख रुपये आणि भावाच्या लग्नाचा तोडगा काढण्यासाठी दीड लाख रुपये खर्च येईल, असं सांगून त्यांनी पीडितेकडून मुलाचे आणि भावाचे फोटो जादुटोणा व तंत्र-मंत्र करण्यासाठी मागवून घेतले.

Parner Police Action : 3 जणांवर गुन्हा; मुख्य आरोपीला अटक

सुरुवातीला पूजेच्या साहित्याच्या नावाखाली महिला सहकारी शोभा तरटे हिने 10 हजार रुपये रोख घेतले. अशा प्रकारे वेळोवेळी भोंदू बाबाने कुटुंबाकडून 6 लाख 50 हजार रुपये उकळले. एवढे पैसे देऊन आणि होमहवन करूनही मुलाच्या प्रकृतीत काहीच फरक पडत नसल्याने आणि उलट छळ वाढत असल्याने महिलेला आपली मोठी आर्थिक व शारीरिक फसवणूक झाल्याचे समजलं. 

त्यानंतर तिने धीर धरून थेट पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करताच तातडीने चक्र फिरवून रात्री उशिरा मुख्य भोंदू बाबा राजू दिवटे याला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
Pune Crime News: दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
Pune Crime News: नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
Embed widget