एक्स्प्लोर

Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित

Pimpri Chinchwad Hooch Death : पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे झालेल्या 14जणांच्या मृत्यू प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली आहे. 

Pune Hooch Tragedy Case : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी हातभट्टीची दारू पिल्यामुळे अवघ्या दोन दिवसांत तब्बल 14 जणांचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. या भीषण विषारी दारू प्रकरणात (Hooch Tragedy) आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी मोठी आणि कडक कारवाई केली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सिकलगर आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) मुलानी यांना तडकाफडकी निलंबित (Suspension) करण्यात आले आहे.

Pune Hooch Crime Investigation : बनावट कागदपत्रांच्या आधारे मिथेनॉलची खरेदी

पोलीस तपासातून या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी भागात तयार झालेली ही जीवघेणी हातभट्टीची दारू केवळ फुगेवाडीतच नव्हे, तर पुण्याच्या हडपसर भागातही मोठ्या प्रमाणावर विकली गेली होती. 

ही विषारी दारू पिल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये 9 जणांचा, तर पुणे शहर परिसरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. जास्तीचा आर्थिक फायदा मिळवण्याच्या हव्यासापोटी योगेश वानखेडे या सराईत दारू विक्रेत्याने मूळ दारूमध्ये मोठ्या प्रमाणात घातक मिथेनॉल (Methanol) केमिकल मिसळले. दारूमध्ये मिसळण्यासाठी वापरण्यात आलेले हे मेथेनॉल ऑनलाइन मार्केटमधून बनावट ओळखपत्राच्या सहाय्याने खरेदी करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे.

Pimpri Chinchwad Hooch Supply : कशी बनली दारू विषारी?

उरळी कांचनमधील राधेशाम प्रजापती हा दारू तयार करण्याचे काम करतो.

प्रजापतीकडून योगेश वानखेडे हा दारू खरेदी करून वेगवेगळ्या गुत्त्यांवर विकतो.

वानखेडेनं अधिक नफ्यासाठी दारूत प्रमाणाबाहेर घातक मिथेनॉल केमिकल मिसळलं.

मिथेनॉलमुळे दारूचं प्रमाण दुप्पट झालं, पण त्याच वेळी ती अत्यंत विषारी बनली.

ही विषारी दारू वानखेडेनं फुगेवाडीतल्या विरका पितापुत्रांना विक्रीसाठी दिली.

हीच जीवघेणी दारू खडकीतल्या अग्रवाल आणि वडारवाडीतल्या धोत्रेलाही विकली गेली.

हडपसर व काळेपडळमधील आकाश जाधव आणि अशोक हांडेनंही ही दारू खरेदी केली होती.

Rohit Pawar Hadapsar Protest : रोहित पवारांचे आंदोलन आणि गंभीर आरोप

पुण्यातील हडपसर येथील पांढरमळा भागातही या विषारी दारूमुळे निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी हडपसरमध्ये जाऊन पीडित कुटुंबांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात जात पोलिसांच्या एकूण कारभारावर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

या बेकायदेशीर दारू विक्रीत स्थानिक पोलीस प्रशासनही आर्थिकदृष्ट्या सहभागी असल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला. तसेच मृत पावलेल्या नागरिकांच्या वारसांना शासनाने प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी हडपसरमधील अवैध दारूविक्रीच्या अड्ड्यांवर जोरदार तोडफोड केली.

ही बातमी वाचा:

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget