एक्स्प्लोर

Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?

Jalgaon Crime News: जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात 26 एप्रिल रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळला होता.

Jalgaon Crime News: जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात 26 एप्रिल रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी चौकशी सुरू केली. बुलढाणा पोलिसांच्या पथकाला माहिती मिळाली की, खगनार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खडकी गावातील 26 वर्षीय शिवानी कळमेकर (Shivani Kalmekar) बेपत्ता आहे. पोलिसांना वाटलं हा मृतदेह शिवानी कळमेकरचा आहे. त्यामुळे त्यांनी शिवानीचे वडील बापूराम कळमेकर व भाऊ अजय कळमेकर यांना शिवानीच्या हत्येच्या संशयावरून ताब्यात घेतलं. दोघांना जळगाव जामोद न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसाची पोलीस कोठडी दिली. (Jalgaon Crime News)

पोलिसांनी न्यायालयाला दोघांनी शिवानीची हत्या आम्हीच केल्याचं कबूल केल्याचं सांगितलं. त्यामुळे न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवलं. दोघेही न्यायालयीन कोठडीत असताना अचानक 28 मे रोजी शिवानीने खगनार पोलिसात हजर होऊन मी जिवंत असल्याचा जबाब दिला. बुलढाणा पोलिसांनी कुठल्याही पुराव्या अभावी व फॉरेन्सिक अहवाल येण्याच्या अगोदरच अनोळखी मृतदेह शिवानीचा असल्याचं जाहीर करून टाकलं. (Jalgaon Crime News)

20 दिवासांनी शिवानी पोलिसात स्थानकांत हजर, सगळे चक्रावले- (Jalgaon Crime News)

दरम्यान वीस दिवसानंतर 28 मे रोजी शिवानी जळगाव जामोद पोलिसात हजर होऊन मी जिवंत असून माझ्या वडिलांना व भावाला मुक्त करा अशी मागणी केली. 29 मे रोजी पोलिसांनी शेगाव न्यायालयात शिवानी जिवंत असून तिच्या हत्याकांडप्रकरणी कारागृहात असलेले तिचे वडील बाबूराम कळमेकर व भाऊ अजय कळमेकर यांच्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले. शेगाव न्यायालयाने दोघांनाही दोषमुक्त केल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली. त्यामुळे आज त्यांची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.

अनोळखी व अर्धवट जळालेला मृतदेह कोणाचा? (Jalgaon Crime News)

दरम्यान बुलढाणा पोलिसांनी निर्दोष व न झालेल्या हत्येच्या प्रकरणात बाप लेकांना कारागृहात ठेवलं यावर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. बुलढाणा पोलीस अद्यापही अनोळखी व अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख पटवू शकलेले नाहीत, सध्या त्या मृतदेहाबद्दल बुलढाणा पोलिसांचे हात खाली आहेत. इतक्या मोठ्या प्रकरणात अद्यापही जिल्ह्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्याने यावर भाष्य केलं नाही. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात आता पर्यंत थातूरमातूर कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या चार कर्मचाऱ्यांना मुख्यालय जमा केल आहे. आता या प्रकरणातील अर्धवट जळालेल्या महिलेची ओळख पोलीस कसे पटवतात हे बघणं महत्त्वाचं आहे. 

सदर संपूर्ण घटना क्रमावर "एबीपी माझा" चे काही सवाल- (Jalgaon Crime News)

1- कुठलाही सबळ पुरावा नसताना बुलढाणा पोलिसांनी आदिवासी समाजाच्या पिता-पुत्रांना का अटक केली..? 

2- डीएनए अहवाल यायच्या आधीच तो मृतदेह शिवानीचाच आहे असा अंदाज पोलिसांनी कसा बांधला...?

3 - पोलिसांनी पिता-पुत्राला अटक केल्यानंतर न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती या सहा दिवसात पोलिसांनी काय काय तपास केला..?

4- अनोळखी मृतदेहाची ओळख पटविल्याविनाच पोलीस निष्कर्षावर कसे पोहोचले...? त्यांचा काय हेतू होता..?

5- अनोळखी मृतदेहाचं प्रकरण दडपण्यासाठी तर शिवानी बनावट हत्याकांड घडवून आणलेलं तर नाही..?, याव्यतिरिक्तही या प्रकरणात अनेक सवाल उठतात. मात्र सध्या तरी बुलढाणा पोलीस दलातील कुठलाही वरिष्ठ अधिकारी यावर बोलण्यास तयार नाही.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Buldhana Crime: बापानं लेकीच्या शरीराचे तुकडे केले? 'ती' महिला थेट पोलीस ठाण्यात हजर, बुलढाण्यातील प्रकरणात मोठी अपडेट समोर

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
Nashik Crime News: 10 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा, नाशिकमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नोटा छापण्याची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले
10 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा, नाशिकमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नोटा छापण्याची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले
Gadchiroli Snake Bite Case: गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक; माजी खासदार अन् पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक; माजी खासदार अन् पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget