एक्स्प्लोर

Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?

पांड्या मुंबई सोडणार ही पहिली वेळ नाही. पांड्या 2015 ते 2021 पर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळला. त्यानंतर त्याने संघ सोडला आणि दोन वर्षे (2022 आणि 2023) गुजरात टायटन्सचे कर्णधारपद भूषवले.

Hardik Pandya: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. आयपीएल सूत्रांच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडताच पांड्याने व्यवस्थापनाला आपल्या निर्णयाबद्दल कळवलं आहे. वरिष्ठ खेळाडूंशी असलेले मतभेद हे त्याने आपल्या निर्णयाचे कारण सांगितले. या 32 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने मोसमाच्या मध्यात मुंबई संघ व्यवस्थापनाला कळवले होते की, संघाची खराब कामगिरी आणि वरिष्ठ खेळाडूंशी असलेल्या मतभेदांमुळे तो तणावाखाली होता. पांड्या आणि मुंबई इंडियन्स यांच्यात विभक्त होण्याबाबत एकमत झाले आहे. या आयपीएल मोसमात मुंबई संघ नवव्या स्थानावर राहिला.

सलग तिसऱ्या मोसमात मुंबई सोडणार असल्याची चर्चा

पांड्या मुंबई इंडियन्स सोडणार असल्याची बातमी समोर येण्याची ही पहिली वेळ नाही. पांड्या 2015 ते 2021 पर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळला. त्यानंतर त्याने संघ सोडला आणि दोन वर्षे (2022 आणि 2023) गुजरात टायटन्सचे कर्णधारपद भूषवले. तो 2024 मध्ये मुंबईत परतला आणि रोहित शर्माच्या जागी त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2024 मध्ये मुंबई संघ दहाव्या आणि शेवटच्या स्थानावर राहिला. 2025 मध्ये संघ प्लेऑफमध्ये पोहोचला, पण विजेतेपद पटकावण्यात अपयशी ठरला. या दोन हंगामांदरम्यान आणि त्यानंतर, पांड्या मुंबई सोडून जाईल किंवा त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले जाईल, अशी चर्चा रंगली होती. 

चाहत्यांनी सातत्याने विरोध केला 

2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार म्हणून संघात परतला. यापूर्वी त्याने दोन वर्षे गुजरातचे कर्णधारपद भूषवले होते. मुंबईने रोहित शर्माच्या जागी हार्दिकला कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. या निर्णयामुळे एमआयचे चाहते नाराज झाले होते. पहिल्या वर्षी (२०२४) मैदानावर हार्दिकला मोठ्या प्रमाणात छपरी म्हणत हुर्रे करण्यात आले होते आणि चालू हंगामातही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडल्या नाहीत. सलग दोन हंगामांपासून चाहत्यांच्या रोषाला सामोरे जाऊनही, हार्दिकने सातत्याने म्हटले आहे की हा प्रवास कठीण पण आनंददायी होता. तथापि, आता त्याने संघापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

पाठीची दुखापत आणि मानसिक थकवा ही कारणे  

एका आयपीएल सूत्राने पीटीआयला सांगितले, "हार्दिक मानसिक तणावाखाली होता आणि पूर्णपणे थकून गेला होता. त्याला पाठीची दुखापतही झाली होती. प्लेऑफच्या आशा संपुष्टात येताच, हार्दिकने संघाच्या निर्णयकर्त्यांना कळवले की तो आता संघात राहणार नाही." सूत्राने पुढे सांगितले की, गेली तीन वर्षे त्याच्यासाठी सोपी नव्हती, कारण एका तरुण खेळाडूला इतके सहन करावे लागते.

ड्रेसिंग रूममधील वरिष्ठ खेळाडूंशी मतभेद

2021 मध्ये हार्दिकने सोडलेली मुंबई इंडियन्सची ड्रेसिंग रूम, 2024 मध्ये तो परतला तेव्हा तशीच राहिली नव्हती. संघातील सर्व वरिष्ठ खेळाडूंचे एकमत नव्हते. मतभेद असूनही निकाल चांगले लागले असते, तर ते निराशाजनक ठरले नसते. 

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget