एक्स्प्लोर

Monsoon Rain: मोठी बातमी: पुढील 7 दिवसांत मान्सूनचे आगमन, रविवारपासून मुंबईत हलक्या सरी कोसळणार; काय सांगतो हवामान विभागाचा अंदाज?

Monsoon Rain: गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Monsoon Rain: गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या सात दिवसांत देशात मान्सूनचे (Monsoon) आगमन होणार असून, रविवारपासूनच मुंबई आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. मात्र, एकीकडे हा तात्कालिक दिलासा मिळत असतानाच, हवामान विभागाच्या दुसऱ्या दीर्घकालीन अंदाजाने (Long Range Forecast) महाराष्ट्राची चिंता कमालीची वाढवली आहे. यंदा संपूर्ण मान्सून हंगामात राज्यात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची आणि जून महिन्यात उष्णतेच्या लाटा (Heatwaves) तीव्र राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Monsoon Rain: मुंबईमध्ये रविवारपासून तीन दिवस हलक्या सरींची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये रविवारपासून सलग तीन दिवस हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसतील. याशिवाय, पालघर आणि ठाणे जिल्ह्यासाठी रविवारी हलक्या सरी तर सोमवारी मेघगर्जनेसह (Thunderstorm) पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही सोमवार आणि मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता असल्याने तेथेही 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

Monsoon Rain: यंदा मान्सून हंगामात केवळ 90 टक्के पाऊस 

आयएमडीने (IMD) नैऋत्य मान्सून 2026 साठी दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. यानुसार, जून ते सप्टेंबर 2026 या चार महिन्यांच्या हंगामात देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या केवळ 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे, जी सामान्य प्रमाणापेक्षा कमी मानली जाते. यंदा मध्य भारतात 43 टक्के, तर दक्षिण द्वीपकल्पात 45 टक्के संभाव्यतेसह सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे चालू वर्षी राज्याला पावसाच्या मोठ्या तुटीचा सामना करावा लागू शकतो.

Monsoon Rain: कोअर झोनमधील कोरडवाहू शेती धोक्यात?

महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भाग हे 'मान्सून कोअर झोन'मध्ये येतात. हा झोन देशातील आणि राज्यातील कोरडवाहू शेतीचा मुख्य कणा मानला जातो. मात्र, या कोअर झोनमध्येच सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची 43 टक्के शक्यता आहे. मान्सूनच्या पहिल्याच म्हणजेच जून महिन्यात देशभरात सरासरीच्या 92 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस राहण्याचा अंदाज आहे. परिणामी, जून उजाडला तरी महाराष्ट्रात पावसाची ओढ कायम राहू शकते, ज्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांवर विपरित परिणाम होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

Monsoon Rain: जून महिन्यात रात्रीही उकाडा 

पावसाची तूट वर्तवली असतानाच, हवामान विभागाने जून महिन्यात विदर्भ, मराठवाडा आणि अंतर्गत महाराष्ट्रात कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक राहून उष्णतेच्या लाटा येण्याचा इशारा दिला आहे. चिंताजनक बाब म्हणजे, किमान तापमानही चढे राहणार असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळीही तीव्र उकाड्याचा सामना करावा लागेल. सध्या प्रशांत महासागरात न्यूट्रल परिस्थिती असली, तरी मान्सूनच्या उत्तरार्धात 'एल निनो' परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार, ज्या ज्या वर्षी एल निनो सक्रिय होतो, त्या वर्षी भारतात, विशेषतः मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट जाणवते.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Maharashtra Weather Update : निसर्गाचा प्रकोप! विदर्भात उन्हाचा कहर, ब्रह्मपुरी देशात सर्वाधिक हॉट; तर मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाचा कहर, बळीराजा दुहेरी संकटात

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
Ratnagiri News: नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीचा हल्ला, अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं; नेमकं काय घडलं?
नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीचा हल्ला, अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं; नेमकं काय घडलं?
Vishakha Raut : रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Embed widget