ABP Majha Headlines : 06 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
पोलिसांनी जप्त केलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून राजकारण पेटलं...शिंदे गटाच्या शहाजीबापूंचे पैसे असल्याचा विरोधकांचा आरोप...संबंध नसल्याचं शहाजीबापूंंचं स्पष्टीकरण...
महाविकास आघाडीची जागावाटपासाठी पुन्हा बैठक...बैठकीआधी थोरातांनी घेतली ठाकरे, पवारांची भेट...आज तोडगा निघणार असल्याचा दावा...
आपले पंख छाटलेेले नाहीत, आपणच थोरातांना ठाकरे, पवारांकडे पाठवलं, नाना पटोलेंचा दावा...आजच्या बैठकीत अंतिम तोडगा निघणार असल्याचा विश्वास....
महाविकास आघाडीत काँग्रेसच राहणार मोठा भाऊ, काँग्रेसला ११० तर शिवसेनेला ९० जागा मिळण्याची शक्यता, शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी ७५ जागा शक्य...
महायुतीमध्ये अद्यापही जागावाटपाचा तिढा.. अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे दिल्लीत.. भाजप श्रेष्ठींशी करणार चर्चा...
महायुतीत एकनाथ शिंदेंना हव्यात आहेत ८५ जागा, ६० जागांची पहिली यादी दिल्यानंतर आणखी २५ जागांची यादी सादर...
महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम असतानाही, पवार ठाकरेंकडून एबी फॉर्म वाटपाला सुरूवात.. काँग्रेस पक्षाकडून मात्र कोणतीही हालचाल नाही..
गणेश नाईकांचे चिरंजीव संदीप नाईकांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश.. भाजपने उमेदवारीचा शब्द देऊन फिरवल्याचा आरोप...