एक्स्प्लोर

Dhananjay Munde: धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?

Parli Vidhan Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी बीडमध्ये अनेक ठिकाणी हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 बीड: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी परळी मतदार संघातील घाटनांदूर येथे मतदान केंद्रावर तोडफोडीची घटना घडली होती. यावेळी मतदान केंद्रावर असलेल्या ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनची तोडफोड केल्याचं देखील समोर आलं होत. आता  याप्रकरणी जवळपास 40 जणांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले.

महाविकास आघाडीचे नेते ऍड. माधव जाधव (Madhav Jadhav) यांना कन्हेरवाडी येथे मारहाण करण्यात आली. व्हिडीओ व्हायरल होताच या मारहाणीचे पडसाद संपूर्ण मतदार संघात उमटले. यावेळी मतदान केंद्राची तोडफोड आणि कर्मचाऱ्याला सुद्धा मारहाण झाल्याची तक्रार देण्यात आली आहे आणि यानूसार चाळीस जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेत यापैकी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मतदान यंत्राची तोडफोड झाली ते घाटनांदुर गाव आज बंद 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाल्यानंतर त्याचे पडसाद घाटनांदुर या ठिकाणी म्हटले आणि घटना येथील मतदान केंद्र मध्ये तोडफोड होऊन झाली या प्रकरणी 40 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि याच घटनेच्या निषेधार्थ आज घाटनांदुर बंद ठेवण्यात आलेले आहे सकाळपासून मधील दुकाने उघडलेली नाहीत. कालच्या घटनेनंतर पोलिसांनी दाखल केलेल्या तरुणावरील गुन्ह्याच्या निषेधार्थ आज घटनादुरु बंद आहे.

मतदारसंघात दहशत निर्माण केल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप-

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आणि मुलाने मतदारसंघात दहशत निर्माण केल्याचा आरोप अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी केला आहे. परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये कधी नव्हे ते गालबोट या निवडणुकीला लागले असून या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांच्याकडून दहशत पसरवण्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. घाटनांदुर मुरंबी तसेच चोथेवाडी या ठिकाणी मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बन्सी शिरसाट यांनाही मारहाण केली असल्यास आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. ज्यांनी तोडफोड केली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा धनंजय मुंडे यांनी केली आहे.

परळी शहरातील बँक कॉलनी परिसरातील मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माधव जाधव यांना मारहाण

परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये बोगस मतदान होत असल्याची तक्रार शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे करत आहेत. याचदरम्यान परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर उमेदवार मतदान केंद्रातील माहिती घेत असताना बाहेर उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते ऍडव्होकेट माधव जाधव यांना तीन ते चार जणांनी मारहाण केल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

आष्टी विधानसभा मतदारसंघातील बेदरवाडी गावात दोन गटात तुंबळ हाणामारी-

बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे परळी विधानसभा मतदारसंघ वगळता पाचही मतदार संघामध्ये सुरळीतपणे मतदान प्रक्रिया दुपारपर्यंत पार पडली मात्र याला अपवाद ठरले. आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी गाव भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार महबूब शेख यांच्या समर्थकांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली मात्रे संपूर्ण प्रकरण हाणामारीमध्ये गेले. सुरेश धस समर्थकांना महबूब शेख यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

Beed Vidhan Sabha Voting: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माधव जाधव यांना मारहाण, VIDEO:

संबंधित बातमी:

Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात 192 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स, भाजप आमदाराचे महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे, म्हणाले..
गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात 192 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स, भाजप आमदाराचे महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे, म्हणाले..
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
Embed widget