एक्स्प्लोर

Mahim Vidhan Sabha: माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?

Amit Thackeray vs Sada Sarvankar vs Mahesh Sawant: माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबई: माहीम विधानसभा मतदारसंघात (Mahim Vidhan Sabha) तिरंगी लढत होणार आहे. मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर, शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत रिंगणात उतरले. या तिरंगी निवडणुकीत अटीतटीची लढाई असल्याने तिन्हीही प्रमुख उमेदवारांकडून मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. त्यामुळे येथे मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांचे प्रमाण समाधानकारक दिसून आले. तसेच माहीम विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढल्याचे समोर आले आहे. 

माहीममधील मतदानाचा टक्का वाढला-

2019 च्या विधानसभा निवडणुकीत माहीम विधानसभा मतदारसंघात 52.67 टक्के मतदान झाले होते. आता 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत माहीममध्ये 58 टक्के मतदान झालं आहे. 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये माहीममधील मतदानाचा टक्का 5.33 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे माहीममध्ये यंदा वाढलेला हा मतदानाचा टक्का कोणाच्या पारड्यात पडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमित ठाकरेंचं डिपॉझिट वाचलं तरी मोठी गोष्ट-

माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांचे डिपॉझिट वाचले तरी खूप मोठी गोष्ट आहे, असं सदा सरवणकर म्हणाले आहेत. तर मी दाव्याने सांगतो, मनसेशिवाय राज्यात सत्ता स्थापन होणार नाही, असा दावाही अमित ठाकरेंनी केला आहे. मी लोकांपर्यंत पोहचलो आहे. मी डोअर टू डोअर प्रचार केला. मला जे करायचं आहे, ते मी लोकांपर्यंत पोहचवलं आहे, असं अमित ठाकरेंनी सांगितले. 

मनसेला 2 ते 4 जागा मिळण्याची शक्यता-

दैनिक भास्करच्या एक्झिट पोलच्या अंदाजानूसार महायुतीला 125-140 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 135-150 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मनसेला 2 ते 4 जागा मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विविध संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानूसार राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे एक-एक जागा महत्वाची असणार आहे. मनसेला 2 ते 4 जागा मिळाल्यास राज ठाकरे भाजपला पाठिंबा देत महायुतीला साथ देण्याची शक्यता आहे. मनसेने जिंकलेल्या दोन ते चार जागा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

अखेरच्या टप्प्यात जोर

दुपारच्या सत्रानंतर मतदान काहीसं वाढलेलं दिसलं. संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान सर्वाधिक मतदान झालं. अंतिम आकडेवारीनुसार, मुंबईत 56 टक्के मतदान झालं. यात सर्वाधिक 62 टक्के मतदान भांडूप पश्चिम मतदारसंघात झाले असून बोरीवली आणि मुलुंडमध्येही 61 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चांदिवलीमध्ये सर्वात कमी 48 टक्के मतदान झालं आहे. वडाळा मतदारसंघात सर्वाधिक 58 टक्के, तर कुलाब्यात सर्वांत कमी 45 टक्के मतदान झालं.

संबंधित बातमी:

Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget