Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 21 फेब्रुवारी 2021 | रविवार | ABP Majha
स्मार्ट बुलेटिन | 21 फेब्रुवारी 2021 | रविवार | एबीपी माझा
1. नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत अमरावतीने मुंबईलाही मागे टाकलं, 24 तासांत अमरावतीत 1 हजार 55 नव्या रुग्णांची नोंद
2. मुंबईत पुन्हा डोकं वर काढणाऱ्या कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी महापालिकेनं कंबर कसली, अनेक बार आणि पबवर कारवाई, एक हजाराहून अधिक इमारती सील
3. पुण्यात लॉकडाऊन लागू झाल्याच्या खोट्या बातम्यांचा व्हिडीओ व्हायरल, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
4. कोरोनाच्या संकटात कार्यालयीन वेळांबाबत धोरण आखण्याची गरज, नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना आवाहन
5. चारित्र्यावरचा संशयाचा डाग पुसण्यासाठी पत्नीला उकळत्या तेलातून नाणं बाहेर काढण्यास सांगितलं, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाशकात गुन्हा दाखल
6. बोचऱ्या थंडीपासून सैनिकांचं संरक्षण करण्यासाठी रँचोकडून खास तंबूची निर्मिती, सोनम वांगचुक यांच्या अविष्काराची सर्वत्र चर्चा
7. हिमप्रलयानंतर तापमान घसरल्यानं अमेरिकेवर मोठं संकट, दीड कोडी जनतेवर बर्फ वितळून पाणी पिण्याची नामुष्की, इलेक्ट्रिसिटी ग्रीडही ठप्प
8. सांगली महापालिकेतील सत्ताकारण! महापौर-उपमहापौर निवडणूक चुरशीच्या वळणावर
9. बर्ड फ्लूची माणसांनाही लागण, रशियामध्ये सापडला बर्ड फ्लूचा पहिला रुग्ण
10. इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अनेक युवा खेळाडूंना संघात स्थान