Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 सप्टेंबर 2021 | शुक्रवार | ABP Majha
1. घरोघरी गणरायाच्या आगमनाची तयारी, घराघरांत भक्तीमय वातावरण, सकाळी 9 वाजता 'एबीपी माझा'सोबत करा गणेशपूजन
2. गणेशोत्सवादरम्यान मुंबईत सध्याचे नियम वगळता नवे निर्बंध नाहीत, पोलीस आयुक्तांची माहिती, गर्दी न करता गणेशोत्सव साजरा करा, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
3. नारायण राणे यांच्या पत्नी निलम आणि मुलगा नितेश राणेंविरोधात लुकआऊट सर्क्युलर, कंपन्यांकडून घेतलेलं 65 कोटींचं कर्ज थकवल्याचा आरोप
4. महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळांसह आठजण दोषमुक्त, मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा, नाशकात समर्थकांचा जल्लोष
5. पुढच्या आठवड्यात आणखी एका कॅबिनेट मंत्र्याचा घोटाळा बाहेर काढणार, किरीट सोमय्यांचा इशारा, उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही आव्हान
6. गर्भवती महिलेचा रुग्णालयात जाण्यासाठी तराफ्यावरुन जीवघेणा प्रवास, परभणीतील मानवद तालुक्यातील धक्कादायक घटना, सुदैवानं आई-बाळ सुखरुप
7. करदात्यांना बाप्पा पावला! करपरतावा भरण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवली, नव्या वेबपोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यानं मुदतवाढ
8. अतिउत्साहाच्या लाटा आवरा! बुलढाण्याच्या थिरोडा पुलावर तरुणांची स्टंटबाजी, दृश्य कॅमेऱ्यात कैद
9. जगप्रसिद्ध फोर्ड कंपनी भारतातील दोन प्लांट बंद करणार, वाहन विक्रित मोठी घट झाल्यानं निर्णय, गुजरातमधील इंजिन प्लांट सुरु राहणार
10. ब्लू टूथ वापरणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा, सायबर संशोधकांना आढळून आला बग, 14 हजारांहून अधिक उत्पादकांना फटका