Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 9 जुलै 2021 | शुक्रवार | ABP Majha
1. लवकरच 6 हजार 100 शिक्षकांची पदं भरली जाणार, अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील गुण ग्राह्य धरणार, भरतीसाठी पवित्र प्रणालीचा वापर
2. पावसाअभावी उत्तर महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं संकट, जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा 24 टक्के पाणीसाठी; पश्चिम महाराष्ट्रात पिकांवर नांगर, विदर्भात पावसाचा जोर कायम
3. भोसरी एमआयडीसी घोट्याळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंची ईडीकडून 9 तास चौकशी, सूडबुद्धीनं चौकशी होत असल्याचा खडसेंचा आरोप
4. युती आणि आघाडीची चिंता न करता कामाला लागा, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश, शिवसेनेकडून पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी
5. कृषी उत्पन्न समितीच्या सक्षमीकरणासाठी 1 लाख कोटी, तर कोरोनातून सावरण्यासाठी आरोग्य क्षेत्रातून 23 हजार कोटी; नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मोठ्या घोषणा
6. केंद्रीय मंत्रिमंडळात पहिल्यांदाच सहकार मंत्री, राज्या अख्त्यारित येणाऱ्या विषयांवर केंद्राची नजर, राज्य आणि केंद्र संघर्ष वाढण्याची शक्यता
7. 10 रुपयांचं तिकीट काढून दिवसभर एसी बसमधून पुण्यात फिरा, पीएमपीएलच्या पुण्य दर्शन योजनेचा आजपासून श्रीगणेशा
8. पाण्याखालील पुलावरुन दुचाकी घेऊन जाणं जीवावर बेतलं, नागपुरातील कमळेश्वर गोरी रस्त्यावर दोघं जण वाहून गेले
9. 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्थानातून अमेरिकेचं सैन्य परतणार, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची मोठी घोषणा, दक्षिण आशिया आणि आफ्रिकेवर लक्ष केंद्रीत करणार
10. कर्णधार विराट कोहली आणि निवड समितीत वादाची ठिणगी, श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या पृथ्वी शॉ आणि देवदत्त पड्डीकलला इंग्लंडला पाठवण्यास निवड समितीचा नकार