ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 18 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 18 April 2025
यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू...पाईपलाईन असून पाणी नाही, हॅण्डपंपही धूळखात, काठोडा पारधी बेड्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य
यवतमाळमधील मुलीच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करु, माझाच्या बातमीनंतर आदिवासी मंत्री अशोक उईके यांचं आश्वासन.. तर पाईपलाईन असूनही पाणी का नाही याची चौकशी करणार असल्याची माहिती
बीडच्या सनगावमधील वकील महिलेला सरपंचाचसह दहा जणांकडून काठ्या, पाईप अमानुष मारहाण, मंदिरातील लाऊडस्पीकरविरोधात तक्रार केल्याने मारहाण केल्याचं समोर, दहा जणांवर गुन्हा
निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेला अटक, बीडमध्ये दाखल तर पोलीस महानिरीक्षकांकडून सेवेतून बडतर्फीची कारवाई...
अपघातग्रस्त रुग्णांसाठी एका लाखापर्यंत कॅशलेस उपचार, आरोग्य खात्याचा महत्त्वाचा निर्णय, तर रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारीसाठी स्वतंत्र मोबाईल अॅप
सरकारने हिंदीची सक्ती केल्यानंतर राज ठाकरेंनी घेतली पक्षाच्या वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक, हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर टोकाचा संघर्ष करण्याची आक्रमक भूमिका























