ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 08 May 2025
ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 08 May 2025
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर हानी झाल्याची पाकिस्तानची कबुली, ३७ जण ठार झाल्याचा दावा, निरपराध नागरिकांचा जीव गेल्याचा पाकिस्तानचा कांगावा
भारताने सांडलेल्या पाकिस्तानी रक्ताचा बदला घेणार, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी, , भारताच्या ८० लढाऊ विमानांनी स्ट्राईक केल्याचाही दावा
भारताच्या हल्ल्यानंतर पाकमध्ये हालचाली वाढल्या, ताबा रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धसामग्री आणि रणगाड्यांची जमवाजमव, सीमावर्ती भागातली पाकमधली गावंही रिकामी
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये दहशत... इस्लामाबाद, रावळपिंडी, लाहोर, कराचीसह अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट, भारत पुन्हा हल्ला करण्याची भीती
बलुच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात पाकिस्तानचे १२ सैनिक ठार, बलुचिस्तानातील बोलन दर्रा भागात आयईडी स्फोट, बीएलएच्या स्पेशल टॅक्टिकल स्क्वॉडने केला हल्ला
पूंछमध्ये पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार, १५ भारतीयांचा मृत्यू तर कित्येक जण जखमी, गोळीबारात हरियाणातील जवान दिनेश कुमार शहीद




















