(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 25 August 2024
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 25 August 2024
पक्षाने संधी दिली तर श्रीजया विधानसभेच्या मैदानात उतरणार, एबीपी माझाच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत अशोक चव्हाणांचं वक्तव्य
अत्याचारग्रस्त महिला दाखल करु शकतात घरातूनच ई-एफआयआर,मोदींचं जळगावमध्ये प्रतिपादन, पण बदलापूर घटनेत पालकांच्या तक्रारीनंतरही एफआयआर नाही..
बदलापूर प्रकरणात पोलिसांकडून पीडितांच्या पालकांना सहकार्यच नाही, पीडितांना रात्रभर ठाण्यात ठेवलं, मेडिकलसाठीही रात्री १२ नंतर नेलं...पालकांनी साधला एबीपी माझाशी संवाद..
बदलापूर प्रकरणात शाळा प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा, पीडितेच्या पालकांची शाळा आणि पोलीस स्टेशनलाच दोन दिवस धावाधाव, प्रकरणाचं गांभीर्य ओळखण्याऐवजी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न...
आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या, बदलापूरच्या पीडितांच्या पालकांची मागणी,मनसे आणि पाठिंबा दिलेल्या बदलापूरकरांचे मानले आभार...
मुंबईतल्या जागांवर महाविकास आघाडीत सहमती, ३६ जागांच्या वाटपात ९९ टक्के सहमती झाल्याची संजय राऊतांची माहिती, पदं आणि जागावाटपावरुन मतभेद नाहीत असंही स्पष्टीकरण..