ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 23 September 2024
ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 23 September 2024
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 तारखेला मिळणार मंत्री आदिती तटकर यांची माहिती
छाणणीमुळे विलंब लागलेल्यांनाही तिन्ही हप्त्यांची रक्कम मिळणार ब्राह्मण समाजाची प्रलंबित मागणी सरकारकडून मान्य परशुरामांच्या नावे आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती.
सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या मानधनात दुपटीन वाढ, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, ग्रामसेवकांना आता ग्रामपंचायत अधिकारी असं संबोधणार.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पासपाखाडीत मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत अभिजीत पानसेंच्या नावाचा अहवाल राज ठाकरेंना प्राप्त. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची.
ही बातमी पण वाचा
दिल्लीवाले येतायत... निवडणूक अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र दौरा ठरला; विधानसभेसाठी 3 दिवस आढावा
मुंबई : राज्यात पुढील 15 दिवसांत आचारसंहिता लागू होणार असून पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकांची (Election) घोषणा होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमात सांगितले. तर, मुख्यमंत्र्यांनीही विधानसभा निवडणुकांबाबत यापूर्वीच भाष्य केलं आहे. त्यामुळे, आता सर्वच राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांनाही निवडणुकांच्या घोषणांचीच उत्सुकता लागून राहिली आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांनीही निवडणुकांसाठी तयारी सुरू केली असून आघाडी व युतीची मोट बांधायला सुरुवात केली आहे. त्यातच, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election commision) अधिकाऱ्यांचा मुंबई (Mumbai) दौरा निश्चित झाला असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ते आढावा घेत आहेत. 26 ते 28 सप्टेंबर या तीन दिवसांत दिल्लीतून अधिकारी महाराष्ट्रात येत असून राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांसंमवेत, जिल्हाधिकाऱ्यांसमवेत ते चर्चा करणार आहेत.
राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच थेट लढत होणार असल्याचे दिसून येते. मात्र, मनसे व वंचित बहुजन आघाडीनेही एकलो चलोचा नारा देत काही उमेदवारांची घोषणाही केली आहे. तसेच, संभाजीराजे छत्रपती आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात तिसरी आघाडी स्थापन झाली आहे. त्यामुळे, राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे दिसून येते. तर, निवडणूक आयोग व प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागल्या आहेत.