ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 03 PM : 13 मार्च 2024 : Maharashtra News
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 01 PM : 13 मार्च 2024 : Maharashtra News
बारामती लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे अपक्ष लढणार, अजित पवारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, शिवतारेेंचा निर्धार
एनसीडीसी मार्फत पंकजा मुंडेच्या साखर कारखान्याला थकहमी कर्ज मिळणार का याकडे लक्ष, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला एबीपी माझाच्या हाती, भाजप ३०, शिवसेना ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ७ जागा लढणार, विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती
भाजपची दुसरी यादी आज घोषित होण्याची शक्यता, महाराष्ट्रातून किमान १३ ते १४ नावं जाहीर करणार
उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपकडून गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियुष गोयल यांना उमेदवारी जवळपास निश्चित, मात्र पूनम महाजन आणि मनोज कोटक यांच्याबाबत सस्पेन्स कायम
नाशिक लोकसभेची निवडणूक शांतीगिरी महाराज महाविकास आघाडीकडून लढवण्याची शक्यता, श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंचं नाव जाहीर केल्यानं शांतीगिरी महाराज नाराज
नाशिक लोकसभा मतदारसंघ ठाकरे गट लढवणार, तर दिंडोरी शरद पवारांची राष्ट्रवादी लढवणार, शरद पवारांची घोषणा
भारत जोडोे न्याय यात्रा धुळे शहरात दाखल, काही वेळानं मालेगावात पोेहोचणार, १७ मार्च रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कवर सभा
नंदुरबारचे काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांचा भाजपमध्ये प्रवेश, राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात असतानाच वळवींचा काँग्रेसला रामराम
शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचं आश्वासन मोदींनी पूर्ण केलंच पाहिजे, कारंजामधील सभेत उद्धव ठाकरेंची मागणी