(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 06 PM: 23 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
उद्याच्या महाराष्ट्र बंदवरून महाविकास आघाडीला हायकोर्टाचा मोठा धक्का...
कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही, बंद केल्यास कायदेशीर कारवाई करावी, कोर्टाचे आदेश...
हायकोर्टाच्या आदेशानंतर उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं शरद पवारांचं आवाहन...वेळेअभावी सुप्रीम कोर्टात तातडीनं दाद मागणं शक्य नसल्याचं केलं स्पष्ट...ठाकरे गट थोड्याच वेळात भूमिका करणार जाहीर...
बंदवरुन हायकोर्टाने चपराक लगावली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मविआवर निशाणा...तर बंद राजकीय होता, फडणवीसांचा हल्लाबोल...
उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाचा धक्कादायक घोटाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनेचा गैरवापर सुरू असल्याचं उघड, एबीपी माझाला काही कंडक्टर्सनी दिली कबुली
आम्हाला मुख्यमंत्रीपदात रस नाही, शरद पवारांची स्पष्टोक्ती, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याच्या ठाकरेंच्या आग्रहानंतर पवारांचं मोठं वक्तव्य...
उद्धव ठाकरेंच्या आग्रहानंतरही काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करण्यावर ठाम, आधी निवडणुकांना सामोरं जाऊ मग मुख्यमंत्री ठरवू, काँग्रेसची भूमिका
विधानसभा निवडणुकीमध्ये गढूळ झालेल्या राजकारणावर राग व्यक्त करा, राज ठाकरेंचं वणीच्या सभेत आवाहन..सव्वा दोनशे जागा लढवणार असल्याचा पुनरुच्चार...
राज्यपालनिर्देशित १२ आमदारांच्या नियुक्त्यांवरची सुनावणी १ ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर..नियुक्त्यांना स्थगिती द्यायला मात्र नकार..
मराठा आंदोलक मनोज जरांगे आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार, सरकार कसं कर्ज माफ करत नाही ते पाहतो, जरांगेंचा सरकारला इशारा
महाराष्ट्रातल्या भाविकांच्या बसला नेपाळमध्ये अपघात, १६ जणांचा मृत्यू, भुसाळमधील यात्रेकरुंवर काळाचा घाला.