ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM: 01 ऑगस्ट 2024 : Maharashtra News
अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याला सुप्रीम कोर्टाची मंजुरी, सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाचा सहा विरुद्ध एक असा निकाल, मात्र वर्गवारीसाठी ठोस आकडेवारी हवी अशी अट.
लोकसभेत पराभव झाल्यानंतर सुजय विखे विधानसभेच्या रिंगणात उतरणार, संगमनेर किंवा राहुरीमधून लढण्याची तयारी, बाळासाहेब थोरात किंवा प्राजक्त तनपुरे असू शकतात प्रतिस्पर्धी...
फडणवीस अनितीमान, असंस्कारी, क्रूर राजकारणी, संजय राऊतांची कडाडून टीका, आव्हान देताना राऊतांची शिवराळ भाषा, संघावरही हल्लाबोल
विधानसभेला मुंबईसाठी भाजपचे विशेष प्लॅनिंग...सहप्रभारी अश्विनी वैष्णव मुंबईच्या ३६ विधान सभा मतदासंघांसाठी बैठका घेऊन रणनीती ठरवणार
पाथर्डी तालुक्यात महावितरण कंपनीचे तीन टॉवर कोसळले, अनेक शेतकरी थोडक्यात वाचले, ११० फूट उंचीचे होते तीन टॉवर..
राहुल आणि प्रियांका गांधी वायनाडला रवाना, मृतांचा अधिकृत आकडा २२८ वर.. अजूनही २४८ लोक बेपत्ता...
हिमाचल प्रदेशात शिमला जिल्ह्यात ढगफुटी, दोघांचा मृत्यु, ५० हून अधिक लोक बेपत्ता...