ABP Majha Headlines 10AM एबीपी माझा हेडलाईन्स 10 AM 27 July 2024 Marathi News
एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी आज पर्वणी, विविध क्षेत्रातल्या नामवंतांशी मनमोकळा संवाद माझा महाकट्ट्यामध्ये..थोड्याच वेळात शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबत महाकट्टा..
अजित पवार गटाचे विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी पुन्हा शरद पवारांसोबत जाणार, दुपारी २ वाजता पक्षप्रवेश करणार..
मराठा आंदोलनाची झळ आता पवारांपर्यंत, पवारांनी मराठा आरक्षणावरची भूमिका स्पष्ट करावी अशी भेटायला गेलेल्या आंदोलकांची मागणी, हॉटेलमध्येच केली घोषणाबाजी...
कोल्हापूरला पुराचा धोका वाढला... पंचगंगा नदीची पाणी पातळी 46 फुटांवर... व्हीनस कॉर्नर चौकामध्ये पाणी साचण्यास सुरूवात
सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांच्याजवळ... खबरदारीसाठी लष्कराची एक तुकडी दाखल... तर चार तालुक्यातील शाळांना आज सुट्टी,
नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही आज दिल्लीत पोचणार, विधानसभेची रणनीती दोघांच्याही अजेंड्यावर...