(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 10 PM : 07 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मला शरद पवार म्हणतात, माझ्या वाटेला गेलात तर मी सोडत नाही, आमदार सुनील शेळकेंना पवारांचा इशारा, तर शरद पवारांनी पुरावा द्यावा, सुनील शेळकेंचं आव्हान
सुनील शेळकेंना सत्तेचा अहंकार, पवारांना आव्हान देण्याची त्यांची लायकी नाही, पवार गटाचे मदन बाफना यांची टीका तर सुनील शेळकेंचा धमकीचा व्हिडीओही समोर
महायुतीच्या जागावाटपात मोठ्या प्रमाणात उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यता, शिंदे - अजित पवारांचे काही उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढण्याची शक्यता
भाजपनं शिवसेनेचा गळा कापू नये, रामदास कदमांचा थेट इशारा, तर कदमांचं अशी वक्तव्य करण्याची सवय, फडणवीसांकडून दुर्लक्ष
रावसाहेब दानवेंच्या खिशात भाजप उमेदवारांची यादी..पत्रकारांना दाखवला कालच्या बैठकीतला कागद..धुळे, नाशिक,पालघर इत्यादी जागांचा दानवेंकडून उल्लेख
नितीन गडकरी्ंनी भाजप सोडून यावं, आम्ही त्यांना निवडून आणू, उमरग्यातील सभेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
((गडकरींनी आमच्यासोबत यावं-ठाकरे))
२०४७ साली भारत विकसित होईल पण तोपर्यंत इथल्या गरीब शेतकऱ्यांनी वाट पाहायची का, त्याला आज काय देणार सांगा, उद्धव ठाकरेंचा थेट मोदींवर घणाघात
शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी ८ एप्रिलला पुढील सुनावणी, अध्यक्षांपुढील सुनावणीतली मूळ कागदपत्रं सुप्रीम कोर्टाने मागवली
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कमध्ये होणार, सभेला राज्य सरकारची परवानगी, १७ मार्चला सभा
कलम ३७० हटवल्यावर मोदी पहिल्यांदाच काश्मीर दौऱ्यावर, विशेष दर्जा काढल्यावर पर्यटनाचे सर्व विक्रम मोडले, मोदींचं वक्तव्य
निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ..१ जानेवारी २०२४पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता ५० टक्क्यांवर