ABP Majha Headlines : 03.00 PM : 21 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुंबई आणि उपनगरात पावसाचा अलर्ट, येत्या २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा मुंबई वेधशाळेचा अंदाज.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस, ठाण्यातही जोरदार बॅटिंग,
मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्टेशनच्या रुळांवर पाणी, वाहतूक धीम्या गतीनं...
मुंबईतला पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा विमानसेवेवर परिणाम, तब्बल 60 विमानांची उड्डाणं रखडल्याची प्रवाशांची तक्रार, दोन-दोन तासांपासून विमानं उड्डाणाच्या प्रतीक्षेत..
मुंबईत घाटकोपरमध्ये दरड कोसळली, सुदैवानं जीवितहानी नाही, पण घरांचं मोठं नुकसान..
राज्यात अतिमुसळधार पाऊस, दक्ष राहा, मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागीय आणि मनपा आयुक्त,जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना आदेश,आप्तकालीन यंत्रणांच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा...
चिपळूणमध्ये वाशिष्टी नदीला पूर, चिपळूण प्रशासनाकडून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी खबरदारी
खेडमध्ये मुसळधार पाऊस सुरूच, जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, एनडीआरएफ आणि सेवाभावी संस्था मदतीसाठी तैनात.
देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे,पवार,पटोलेंना चॅलेंज, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं की नाही ते स्पष्ट करा असं आव्हान..
'राजकारणात कधी तह तर कधी सलगी
करावी लागते, अजित पवारांशी केलेल्या हातमिळवणीसंदर्भात फडणवीसांची सप्ष्टोक्ती
डीपीडिसीच्या बैठकीत पवार साहेबांचा कधी अपमान केला? अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना सवाल, बोलू दिलं नाही हे मान्य असंही स्पष्टीकरण...
अजित पवारांचा उद्या वाढदिवस,पण कार्यकर्त्यांकडून आजपासूनच जल्लोष... केकवर मुख्यमंत्री होण्यासाठीचा मेसेज