ABP Majha Headlines : 10 AM : 9 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 10 AM : 9 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत जागावाटपावर कुठलाही तोडगा निघाला नाही, महायुतीतील सूत्रांची माहिती, दोन दिवसानंतर दिल्लीत होणाऱ्या बैठकीत जागावाटप अंतिम होण्याची शक्यता
नाशिकमध्ये आज मनसेचा १८ वा वर्धापनदिन,राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल. राज ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांच लक्ष.
बारामती मतदारसंघातील नसरापूरमध्ये सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची जाहीर सभा, बाळासाहेब थोरात,संजय राऊत उपस्थितीत राहणार, कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटेही सभेला येणार
वंचितला किती जागा द्यायच्या यावरून महाविकास आघाडीत मतभिन्नता, पाच जागा देण्याला पवार आणि ठाकरे सहमत, तर तीनच जागा द्याव्यात असं संजय राऊत आणि नाना पटोलेंचं मत
कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव, शाहू महाराज छत्रपती यांच्याविरोधात समरजीत घाटगेंना मैदानात उतरवण्याच्या हालचाली.
लोकसभा निवडणुकीसाठी 39 उमेदवारांची काँग्रेसची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी लढणार यावर शिक्कामोर्तब
रामेश्वरम कॅफे स्फोटाप्रकरणी संशयित आरोपी पुण्यात असल्याचा एनआयएला संशय. पुण्यातील कोंढवा भागात या संशयीताचा शोध सुरु,