ABP Majha Headlines : 7 AM : 8 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7 AM : 8 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावानंतर राज्यात येत्या 24 तासांत गारठा वाढू लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाला पोषक स्थिती होती. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाा पट्टा कमकुवत झाला असून राज्यात कोरडे व शुष्क वारे वाहणार आहेत. येत्या 4 दिवसात महाराष्ट्रात तापमानात घट होणार असून 3 ते 4 अंशांनी तापमान कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. पुण्यात आज 14 ते 15 अंश सेल्सियस तापमान राहण्याचा अंदाज आहे. तर आजपासून महाराष्ट्रात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता IMD चे पुणे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी x माध्यमावर वर्तवलाय.
राज्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होते. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. थंडीचा जोर पूर्णपणे कमी झाला, तर काही भागात उकाडा जाणवू लागला आहे. 9 डिसेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत शुष्क अन् कोरडे वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे, तर 8 डिसेंबरपासून पुन्हा तापमानात घट होऊन थंडी वाढणार आहे. राज्यात मागील 3 दिवसांपासून ढगाळ व दमट हवामान होते. थंडी गायब झाली होती. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वारे थांबवल्यानं अरिबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा वेग वाढून पावसाला पोषक परिस्थिती निर्माण झाली होती. आता कमी दाबाचा हा पट्टा ओसरला असून कोरडे वारे राज्यभर वाहणार आहेत.